
सुंदर, आकर्षक, पाणीदार डोळे कोणाला आवडत नाहीत? सर्वांनाच आवडतात. मात्र, जेव्हा डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे तयार होतात किंवा डोळ्यांच्या आजुबाजूच्या त्वचेवर सुरकूत्या पडतात. तेव्हा ते डोळ्यांच्या सौंदर्याला मारक ठरते. आपल्या डोळ्यात आपोआपच उदास दिसतात. तसेच डोळ्यातील चमकही नाहीशी होते. यामागे अनेक कारणे असू शकतात. जाणून घ्या डोळ्यांचे सौंदर्य आणि आरोग्य जपण्यासाठी कशी काळजी घ्याल.
डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्यासाठी तुमचा आहार, तुमची जीवनशैली इत्यादी गोष्टी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. याशिवाय अपुरी झोप, स्क्रीनसमोर खूप वेळ घालवणे हे कारण सुद्धा असू शकते. यासाठी आपल्याला डोळ्यांची खास काळजी घेणे आवश्यक आहे.
मीठाचे प्रमाण
तुमच्या आहारात मीठाचे प्रमाण जास्त असेल तर ते सगळ्यात आधी कमी करा. जास्त मीठ खाल्ल्यामुळे शरिरातील पाणी जास्त प्रमाणात शोषले जाते. त्यामुळे डोळ्यांखाली मांसल भाग तयार होतो. त्यामुळे आहारात मीठाचे प्रमाण योग्य ठेवा. तसेच भरपूर पाणी प्या.
झोपण्याची उशी बदला
तुमची झोपण्याची उशी देखील डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि सुरकुत्या येण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. उशीवर असणा-या जीवाणूंमुळे डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. डोळे लाल होणे किंवा थकलेले दिसणे अशा समस्या यामुळे उद्भवू शकतात. बाजारात अँटी अॅलर्जिक उशा मिळतात. यांचा वापर निश्चित फायदेशीर ठरू शकतो.
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच क्रीम लावा
डोळ्यांभोवती काळी वर्तुळे आणि सुरकुत्या घालवण्यासाठी मार्केटमध्ये अनेक क्रीम उपलब्ध आहेत. मात्र, या क्रीम्समध्ये वेगवेगळे रासायनिक घटक असतात. तसेच डोळ्यांचा भाग नाजूक असतो. त्यामुळे बाजारातील कोणतीही क्रीम वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
काकडीचे काप
डोळ्यांवर काकडीचे काप ठेवल्यास त्याने त्वचेला गारवा मिळतो. डोळ्यांना शांतता मिळते. तसेच याचा फायदा काळी वर्तुळे आणि सुरकूत्या कमी करण्यासाठी देखील होतो.
पपईचा गर
पपईचा गर देखील खूप उपयोगी आहे. यामुळे डोळे ताजेतवाने दिसतात. डोळ्यांचे सौंदर्य वाढते.
स्क्रीन टाईम कमी करणे
आजच्या डिजिटल युगात सगळ्यांचाच जास्तीत जास्त वेळ हा स्क्रीन समोर असतो. हा स्क्रीन टाईम कमी करणे आवश्यक आहे. याचे विपरीत परिणाम डोळ्यांचे आरोग्य आणि सौंदर्यावर होतात.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)