विनाअट कर्जाची ऑफर ठरेल अनन्वित छळाचे कारण; फोन, ईमेल, एसएमएसवरून केले जाणारे संपर्क टाळा

असा कुणी मोबाइलधारक नसेल ज्याला कुठल्या ना कुठल्या तरी वित्तसंस्थेकडून आकर्षक ऑफर देण्यासाठी कॉल आला नाही. चाचपणी केल्याशिवाय अशा कॉलला प्रतिसाद देणे चांगलेच गोत्यात आणणारे ठरू शकते. अशा कॉलवर विश्वास ठेवून आजवर हजारो लोक फशी पडले आहेत. याच ऑफरचा मारा ईमेल आणि एसएमएसवरही होत असतो.
विनाअट कर्जाची ऑफर ठरेल अनन्वित छळाचे कारण; फोन, ईमेल, एसएमएसवरून केले जाणारे संपर्क टाळा
Published on

मुंबई: असा कुणी मोबाइलधारक नसेल ज्याला कुठल्या ना कुठल्या तरी वित्तसंस्थेकडून आकर्षक ऑफर देण्यासाठी कॉल आला नाही. चाचपणी केल्याशिवाय अशा कॉलला प्रतिसाद देणे चांगलेच गोत्यात आणणारे ठरू शकते. अशा कॉलवर विश्वास ठेवून आजवर हजारो लोक फशी पडले आहेत. याच ऑफरचा मारा ईमेल आणि एसएमएसवरही होत असतो. कोरोना महामारीच्या काळात गरजूंना कोणत्याही अटीशिवाय कर्जाची ऑफर देणारे कॉल, एसएमएस आणि व्हॉट्सअॅप मेसेज येत. त्याला बळी पडून ज्यांनी कर्ज घेतली त्याची किंमत ते अजून चुकवत आहेत. कर्ज देताना त्यांना त्या कंपनीचे अॅप डाऊनलोड करून घेण्यास सांगितले जाई. त्यामुळे मोबाइल हॅक होऊन सारा डाटा कंपनीकडे जायचा. त्यानंतर भरमसाट व्याज लावून वसुलीसाठी धमक्या, शिवीगाळ, मॉर्फ केलेले फोटो नातेवाईकांना पाठवणे अशा भयानक अनुभवातून हजारो लोक गेलेत. हे सारे आजही घडत आहे. याविरोधात संघटित होऊन आवाज उठवणे कठीण असल्याने निमूटपणे सारेजण हा अत्याचार सहन करतात.

कर्ज घोटाळ्यात फसवणूक करणारा सुरक्षा अनामत म्हणून तुमच्याकडून काही रक्कम लाटतो किंवा प्रोसेसिंग फी, लेट फी, व्याज अशा वेगवेगळ्या बहाण्याने बरीच रक्कम उकळतो. माणून अनोळखी क्रमांकावरून कॉल आला तर सावध व्हा. तो स्पॅम अथवा फसवणारा कॉल असू शकतो. अशा कॉलवर चुकूनही तुमचे बैंक खाते, क्रेडिट कार्डचा क्रमांक अथवा संवेदनशील माहिती देऊ नका. असा कॉल करणारी व्यक्ती तुम्हाला कुठले पारितोषिक, बक्षीस, कर्ज देण्याचे आश्वासन देत असेल तर हुरळून जाऊ नका. त्या कॉलची सत्यता तपासा. अपरिचित व्यक्तींकडून असे ईमेल आल्यास ते ब्लॉक करा. तो फिशिंगचा प्रकार असतो. तुमची व्यक्तिगत माहिती चोरणे हाच त्यांचा तद्देश असतो. ईमेलने संशयास्पद लिंक आली तर क्लिक करू नका. तसे करणे तुम्हाला धोकेबाज वेबसाइटवर घेऊन जाईल. हेच एसएमएसबाबतही लागू होते.

स्कॅमर नामांकित नॉन ब्रेकिंग फायनान्शियल कंपन्यांचे लोगो आणि बनावट आयडी वापरून विश्वासार्हता मिळवतात. ते बनावट मंजुरी पत्रे किंवा चेकचे फोटी पाठवून आगाऊ पैसे मागू शकतात. एकदा पैसे हाती पडले की ते गायब होतात.

काय कराल?

  • आरबीआयचे नियम पाळा ऑफर देणाऱ्या कंपन्या आरबीआयकडे नोंदणीकृत आहेत का याची खात्री करा.

  • खरेपणा पडताळून पाहा: ऑफर पाठवणाऱ्याच्या तपशिलांची उलटतपासणी करा आणि थेट अधिकृत कंपन्यांशी थेट संपर्क साधा.

  • संशयास्पद मेसेजची तक्रार करा कोणतेही खोटे संदेश अधिकृत रिपोर्टिंग चॅनेलवर फॉरवर्ड करा आणि इतरांना सावध करा.

काय टाळाल?

  • अवास्तव ऑफरवर विश्वास ठेवू नका पडताळणीशिवाय फोन, ईमेलद्वारे आलेल्या ऑफरवर कधीही विश्वास ठेवू नका.

  • संवेदनशील माहिती शेअर करू नका ऑफरची पुष्टी केल्याशिवाय वैयक्तिक किवा आर्थिक तपशील देणे टाळा.

  • आगाऊ शुल्क भरू नका खरे कर्जदार कर्जप्रक्रियेसाठी आगाऊ पैसे घेत नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in