Father's Day 2024 Wishes: पितृदिनानिमित्त तुमच्या लाडक्या वडिलांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!

Happy Father's Day 2024: दरवर्षी 'फादर्स डे' अर्थात पितृदिन जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. हा खास दिवस यावर्षी १६ जून रोजी साजरा केला जाणार आहे.
Father's Day 2024 Wishes in Marathi
Happy Father's Day 2024 MessageFreepik

Father's Day 2024 Wishes in Marathi: 'बाप हा कडुलिंबाच्या झाडासारखा असतो, त्याची पाने कडू असली तरी थंडगार सावली देतात..! वडील आणि मुलांचे नाते या जगात अनोखे आहे. एकीकडे बाप मुलांना त्यांच्या भल्यासाठी खडसावतो, तर दुसरीकडे तो मुलांवर खूप प्रेम करतो. एक पिता आपल्या मुलाच्या गरजा पूर्ण करून आपलं प्रेम व्यक्त करतो. हे प्रेम, आपुलकी आणि त्याग साजरा करण्यासाठी दरवर्षी जगभरात 'फादर्स डे' साजरा केला जातो. आम्ही तुम्हाला सांगतो की दरवर्षी 'फादर्स डे' जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. हा खास दिवस यावर्षी १६ जून रोजी साजरा केला जाणार आहे. तुम्हालाही तुमच्या वडिलांचे आभार मानायचे असतील तर तुम्ही हे खास संदेश (Father's Day 2024 Wishes, Status, Images, Quotes, Messages & Greetings)पाठवू शकता.

पाठवा हे शुभेच्छा कोट्स

> कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा,

शांत, प्रेमळ, कठोर, रागीट बहुरूपी बाबा

Father's Day!!

> वडील या व्यक्ती मुळे आजपर्यंत

कोणासमोर झुकायची वेळ पडली नाही

आणि पडणार पण नाही

हॅपी फादर्स डे!

Father's Day 2024 Wishes in Marathi
Father's Day 2024: 'फादर्स डे'ला वडिलांना काय गिफ्ट द्यायचं समजत नाहीये? 'हे' पर्याय बघा!

> खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही,

माझ्या वाडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही

हॅपी फादर्स डे!

> बाप असतो तेल वात, जळत असतो क्षणाक्षणाला,

हाडांची कडे करून, आधार देतो मनामनाला..

पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Father's Day 2024 Wishes in Marathi
Prostate Cancer: पुरुषांमध्ये वाढतोय प्रोस्टेट कर्करोगचा धोका, जाणून घ्या तपासणी विषयी माहिती

> बाबांचा मला कळलेला अर्थ

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर

बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन

स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंत:करण

जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!!

> या जगात फक्त वडीलच असे व्यक्ती आहेत,

ज्यांना वाटते की,

त्यांची मुले त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावेत...

हॅपी फादर्स डे!!

(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)

logo
marathi.freepressjournal.in