यकृत कमकुवत होण्याची समस्या आहे? आहारातील 'हे' तेल आणि साखर असू शकतात कारणीभूत; जाणून घ्या योग्य पर्याय

मोठ्या प्रमाणात चटपटीत आणि चमचमीत किंवा खूप जास्त ऑईली पदार्थ खाणे, त्यातही बाहेरचे तळलेले पदार्थांसाठी वापरलेले तेलाची गुणवत्ता न तपासताच खाणे यामुळे यकृताचे आजार वाढत आहेत. खराब तेलातील अन्न पदार्थ खाल्ल्याने यकृताला गंभीर नुकसान पोहोचतात. सोबतच खूप जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने देखील यकृत खराब होते. जाणून घ्या, खराब तेल आणि साखर यामुळे यकृताला कसे नुकसान पोहोचते आणि चांगले पर्याय काय आहेत.
यकृत कमकुवत होण्याची समस्या आहे? आहारातील 'हे' तेल आणि साखर असू शकतात कारणीभूत; जाणून घ्या योग्य पर्याय
AI Generated Image
Published on

यकृत अर्थात लिव्हर हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यकृताचे कार्य व्यवस्थित असेल तर पोट चांगले राहते आणि तुम्ही संपूर्ण क्षमतेने आपले दैनंदि कार्य पार पाडू शकता. मात्र, आजच्या धावपळीची जीवनशैली अवेळी आणि अयोग्य आहार घेणे. मोठ्या प्रमाणात चटपटीत आणि चमचमीत किंवा खूप जास्त ऑईली पदार्थ खाणे, त्यातही बाहेरचे तळलेले पदार्थांसाठी वापरलेले तेलाची गुणवत्ता न तपासताच खाणे यामुळे यकृताचे आजार वाढत आहेत. खराब तेलातील अन्न पदार्थ खाल्ल्याने यकृताला गंभीर नुकसान पोहोचतात. सोबतच खूप जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने देखील यकृत खराब होते. जाणून घ्या, खराब तेल आणि साखर यामुळे यकृताला कसे नुकसान पोहोचते आणि चांगले पर्याय काय आहेत.

तेल यकृताला कसे नुकसान करते?

खराब तेल विशेषतः रिफाइंड तेल मग ते कोणतेही असो आणि ट्रान्स फॅट्स असलेले तेल, यकृताचे जलद नुकसान करतात. जर तुम्ही जास्त जंक फूड खाल्ले तर यकृतामध्ये चरबी जमा होऊ लागते. ज्यामुळे ते योग्यरित्या कार्य करू शकत नाही. याशिवाय, खराब तेलात तळलेल्या आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये असलेली वाईट चरबी यकृताच्या पेशींना नुकसान पोहोचवते. यामुळे यकृताला सूज येऊ शकते. तर तेलकट पदार्थांमुळे विषारी पदार्थ काढून टाकण्याची प्रक्रियाही मंदावली जाते.

साखर यकृताला कसे नुकसान करते?

जरी तुम्हाला गोड खाण्याची आवड असली तरी तुमचे यकृत खराब होऊ शकते. गोड पदार्थ खाल्ल्याने तुमचे वजन तर वाढतेच पण यकृतावरही जास्त दबाव येतो. जास्त साखर खाल्ल्याने यकृतामध्ये चरबी जमा होते. ज्यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगाचा धोका वाढतो. याशिवाय, जास्त फ्रुक्टोज यकृतामध्ये इन्सुलिन प्रतिरोध वाढवते. यामुळे टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

यकृत निरोगी ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

  • प्रक्रिया केलेल्या आणि परिष्कृत साखरेऐवजी, तुमच्या आहारात गूळ, मध आणि फळे समाविष्ट करा (Healthy Liver Diet).

  • बाहेरील तेलकट पदार्थ खाणे टाळा. सोबतच रिफाईंड किंवा डबल रिफाईंड तेल खाणे बंद करा. त्याऐवजी घाण्याचे तेल (Cold Press Oil) मोहरीचे तेल किंवा देशी तूप वापरू शकता.

  • तुमच्या आहारात संपूर्ण धान्य, फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

  • दिवसभरात कमीत कमी चार लिटर पाणी प्या.

  • दररोज व्यायाम करा, जेणेकरून शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.

हे तेल आणि साखरेचा पर्याय आहे.

साखरेचे पर्याय - गूळ, मध, खजूर, नारळ साखर

तेलाचे पर्याय - मोहरीचे तेल, खोबरेल तेल, करडीचे तेल, तिळाचे तेल, देशी तूप मर्यादित प्रमाणात

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in