
चेहऱ्यावर लांब पसरट स्वरुपाचे डाग असतील तर त्याला वांग असे म्हणतात. वांगाचे डाग हे खूप काळ्या किंवा तपकिरी रंगाचे असतात. ते सहसा जात नाहीत. एकदा वांग यायला सुरुवात झाली की ती गालावरून नाकावर आणि पलीकडच्या गालावर अशी पसरते. यामुळे सुंदर त्वचेवर वांगाचे काळे डाग खूपच वाईट दिसतात. यामुळे मन हिरमुसल्यासारखे होते. काही घरगुती नैसर्गिक पदार्थांनी यावर उपायांनी वांग दूर होऊ शकते.
कोरफडचा गर चोळणे
चेहऱ्यावर वांग आली असेल तर त्यावर कोरफड हा सर्वोत्तम औषधी उपाय असतो. अंगणात कुंडीमध्ये कोरफडचे रोप लावून ते वाढवल्यास तुम्ही घरच्या घरी दररोज कोरफडचा गर काढून तो वांग असलेल्या भागावर चोळा. कोरफड ही बहुगुणी औषधी वनस्पती आहे. याचा त्वचेला निश्चितच फायदा होतो.
वांगसाठी फेसपॅक
काकडीचा रस, लिंबूरस आणि दूध एकत्र करून वांगसाठी फेसपॅक तयार करावा. हलक्या हाताने याचा मसाज करावा. वांगाचे डाग हळूहळू कमी होतात.
तुळशीतील माती
तुळशीतील माती पाण्यात गाळणीने स्वच्छ करून घ्यावी ही चिकणी झालेली माती अतिशय उपयुक्त असते. तुळशीचे गुणधर्म देखील यात मिळालेले असतात. तुळशीची चेहऱ्याला दररोज किमान तीन तास तरी लावून ठेवावी हा उपाय प्रभावी ठरतो.
बटाट्याने मसाज द्यावा
बटाटा हे एक नैसर्गिक ब्लिच आहे. त्यामुळे बटाट्याने वांग असलेल्या डागांवर चोळावे. यामुळे स्कीनला नैसर्गिक ब्लिच होते आणि वांगाचे डाग फिके होतात.
कच्च्या दुधाने चेहरा साफ करणे
सकाळी उठल्यानंतर चेहरा कच्च्या दुधात कापूस भिजवून त्याने साफ करावा. यामुळे फक्त वांगच नाही तर संपूर्ण चेहरा उजळण्यासाठी मदत मिळते.
ऑईल लावणे
टी ट्री ऑईल, बदाम, नारळ किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये एकत्रित करून त्याने मसाज करावा.
तुळशीची पाने
वांगवर तुळशीच्या पानांचा लेप लावणे फायदेशीर ठरते. तुळशीची पाने वाटून त्याचा रस तयार करून यामध्ये लिंबाचा रस मिसळून त्याचे लेपन करावे. खूप पटकन फायदा मिळतो.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)