चहाप्रेमी आहात? वारंवार चहा पिणे पडेल महागात, पाहा शरीरावर होणारे दुष्परिणाम

जास्त चहा प्यायल्याने आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जाणून घेऊया जास्त चहा प्यायल्याने होणारे परीणाम.
चहाप्रेमी आहात? वारंवार चहा पिणे पडेल महागात, पाहा शरीरावर होणारे दुष्परिणाम

हंगाम कोणताही असो चहा प्रेमी चहा पितातचं, तर बऱ्याचं लोकांना फक्त हिवाळ्याच्या दिवसांमध्ये चहा प्यायला आवडतो, भारतात बहुतेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. तर काही लोकं सकाळी, संध्याकाळी आणि दुपारी वाटेल तेव्हा चहा पितात. काहींना तर चहाचं व्यसनच असतं चहा मिळाला नाही तर ते बेचैन होतात. पण या व्यसनाने कालांतराने रोग होऊ शकतात. जे लोक दिवसभर जास्त चहा पितात त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जास्त चहा प्यायल्याने आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जाणून घेऊया जास्त चहा प्यायल्याने होणारे परीणाम.

जे दिवसातून अनेक वेळा चहा पितात त्यांच्या शरीरात लोहाची कमतरता जाणवू शकते. चहाच्या पानांमध्ये टॅनिन नावाचा पदार्थ आढळतो, जो शरीरातील लोह घटकांना चिकटून राहतो आणि पचन प्रक्रियेतून काढून टाकतो. त्यामुळे अ‍ॅनिमियाची समस्याही उद्भवू शकते. चहामध्ये इतरही अनेक घटक आढळतात, जे जास्त प्रमाणात आजारांना कारणीभूत ठरू शकतात.

जास्त चहा पिण्याचे दुष्परिणाम

  • जास्त चहा प्यायल्याने अस्वस्थता आणि थकवा येऊ शकतो. चहाच्या पानात आढळणारे कॅफिन शरीरातील अस्वस्थता आणि थकवा वाढवते.

  • चहाच्या अतिसेवनामुळे झोपेवर परिणाम होतो. जास्त प्रमाणात कॅफिनमुळे समस्या उद्भवू शकतात. निद्रानाशाचा त्रास असलेल्यांनी चहा कमी प्यावा.

  • चहाच्या पानांमध्ये काही घटक असतात ज्यामुळे मळमळ होऊ शकते. यामुळे तुम्हाला उलट्या झाल्यासारखे वाटू शकते.

  • दिवसातून अनेक वेळा चहा प्यायल्यानेही पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अ‍ॅसिडीटी आणि गॅसच्या तक्रारी होऊ शकतात.

  • गर्भवती महिलांनी चहापासून दूर राहावे. हे त्यांच्यासाठी गंभीरपणे हानिकारक असू शकते.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in