
नैसर्गिक घटकांचे त्वचेला होणारे फायदे नेहमीच चर्चेचा विषय आहे. फळांचे तुमच्या त्वचेवर आश्चर्यकारक परिणाम होेतात व ते सुरक्षितही असतात. फळांचे फेशियल तुमच्या त्वचेतील नैसर्गिक सौंदर्य वाढवतात. म्हणून, जर तुम्ही काही नैसर्गिक फळांचे फेस पॅक शोधत असाल, तर खाली दिलेले घरगुती फळांचे फेस पॅक पहा.
सफरचंद: जर तुमच्या त्वचेवर प्रदूषण आणि सूर्यप्रकाशामुळे नुकसान होत असेल, तर तुम्ही सफरचंद वापरून पाहायला हवे. सफरचंदामध्ये कॉपर असतो, जो मेलॅनिन निर्माण करतो, ज्यामळे त्वचा उजळू शकते आणि UV किरणांपासून संरक्षण होऊ शकते. मेलॅनिन मृत त्वचा पेशी पुनर्जीवित करण्यासही मदत करते.
कृती : अर्ध्या सफरचंदात दोन चमचे मध आणि दोन चमचे ओट्स घालून मिक्सरमध्ये टाका. तुम्ही हे दररोज स्क्रब म्हणून वापरू शकता, ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या पोरसमधील घाण काढता येईल.
केळी: तुमची त्वचा कोरडी आहे? त्यासाठी केळी हा उत्तम उपाय आहे. केळीमध्ये पोटॅशियम आणि आर्द्रता असते जी कोरडी आणि खराब झालेल्या त्वचेचे पुनर्निर्माण करते. केळांमधील जीवनसत्त्वे देखील आर्द्रता पुन्हा मिळवून देतात.
कृती : एका मध्यम आकाराच्या केळाचे पॅक तयार करा, त्यात १/४ कप दही आणि दोन चमचे दालचिनी आणि मध घाला. २० मिनिटे ठेवून ते सुकल्यावर धुवा.
स्ट्रॉबेरी: जर तुमची त्वचा नाजूक असेल आणि तुम्हाला एलर्जी होण्याची चिन्हे असतील तर स्ट्रॉबेरी सर्वोत्तम आहे. स्ट्रॉबेरीतील जीवनसत्त्व C सूज निर्माण करत नाही आणि तुमची त्वचा निरोगी, चमकदार बनवते. स्ट्रॉबेरीमध्ये सॅलिसिलिक आणि एलर्जिक अॅसिड देखील असतात, जे डाग आणि हायपरपिग्मेंटेशन कमी करतात.
कृती : काही स्ट्रॉबेरी मिक्सरमध्ये लाऊन पेस्ट तयार करा. दोन चमचे दही आणि एक चमचा मध घालून स्ट्रॉबेरी फेस मास्क तयार करा. ते तुमच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावा व सुकल्यावर कोमट पाण्याने धुवा.
संत्रा: सिट्रिक अॅसिड आणि जीवनसत्त्व C ने समृद्ध असलेले संत्रे उत्कृष्ट एक्सफोलिएटर आहेत, तुमच्या त्वचेचा ग्लो वाढवतात आणि टॅन काढून टाकतात. संत्रे सुरकुत्या कमी करतात त्याचबरोबर ते तुमच्या त्वचेचे कोलेजन वाढवण्यास मदत करतात. संत्र एक उत्कृष्ट मॉइश्चरायझर देखील आहे, ज्यामुळे त्वचा मऊ आणि लवचिक राहते.
कृती: संत्रे सोलून त्याला मॅश करा, त्यात एक चमचा हळद घाला आणि घट्ट पेस्ट तयार करा. तुम्ही २ चमचे बेसन घालून याला अधिक घट्ट करू शकता. हे तुमच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावा आणि १५ मिनिटे ठेवा. ते सुकल्यानंतर, कोमट पाण्याने धुवा.
पपई: जर तुमच्या डोळ्यांच्या भोवताली डार्क सर्कल्स असतील, तर पपई तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पपईतील अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्व E आणि जीवनसत्त्व C तुमच्या त्वचेचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करू शकतात. याशिवाय, पपईतील पपाइन नावाचे एंझाईम मृत त्वचा पेशी नष्ट करतात आणि त्वचेला ताजे बनवण्यास मदत करतात.
कृती: १/४ पपईत एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घालून ते मिक्स करा. त्याची पेस्ट बनवुन तुमच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावा. ते सुकल्यानंतर, कोमट पाण्याने धुवा. ही पेस्ट तुमच्या त्वचेची खोलवर स्वच्छता करेल आणि सर्व मृत त्वचा काढून टाकेल.
टीप : सुरुवातीला, ही फळं तुमच्या त्वचेसाठी योग्य आहेत का हे तपासण्यासाठी एक पॅच टेस्ट करा.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)