Fruit Juices Side Effects: चुकूनही पिऊ नका 'या' फळांचे ज्यूस किंवा सरबत; मधुमेहाच्या रुग्णांनी घ्यावी विशेष काळजी

फळांचा आहार हा आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. त्यातल्या त्यात उन्हाळा चालू असल्यामुळे हल्ली आपल्या ज्यूस किंवा सरबत असे पदार्थ वारंवार प्यावेसे वाटतात. मात्र, काही वेळा काही फळांचे ज्यूस पिणे हे आरोग्यासाठी अपायकारक (Fruit Juices Side Effects) ठरू शकते. जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात.
Fruit Juices Side Effects: चुकूनही पिऊ नका 'या' फळांचे ज्यूस किंवा सरबत; मधुमेहाच्या रुग्णांनी घ्यावी विशेष काळजी
Freepik
Published on

फळांचा आहार हा आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. त्यातल्या त्यात उन्हाळा चालू असल्यामुळे हल्ली आपल्या ज्यूस किंवा सरबत असे पदार्थ वारंवार प्यावेसे वाटतात. मात्र, काही वेळा काही फळांचे ज्यूस पिणे हे आरोग्यासाठी अपायकारक (Fruit Juices Side Effects) ठरू शकते. जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात.

संत्रा आणि मोसंबी

संत्रा आणि मोसंबी ही दोन्ही फळे उन्हाळ्यात खाणे खूप फायदेशीर असते. तसेच मोसंबीचा ज्यूस किंवा संत्र्याचा ज्यूस तर आरोग्यासाठी खूपच लाभदायक असतो. उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेट झाल्याने मोसंबी आणि संत्र्याच्या ज्यूसला लोक पसंती देतात. मात्र आहारतज्ज्ञांच्या मते ही फळांचा ज्यूस न घेता ही फळे चावून चावून खाणे जास्त फायदेशीर ठरते. कारण ज्यूस तयार करताना यामधील फायबर कमी होते आणि साखरेचे प्रमाण वाढते. याशिवाय ज्यूस तयार केल्यामुळे अतिरिक्त सेवन केले जाते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यायला हवी.

अननस

अननस हे फळ 'क' जीवनसत्त्वाने युक्त आहे. या फळात हे अनेक आजारांवर उपयुक्त आहे. मात्र, हे फळही छोटे-छोटे तुकडे करून खाणे उपयुक्त आहे, असे केल्याने दातांच्या समस्यांना फायदा होतो. कारण 'क' जीवनसत्त्व हे दातांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे असते. त्यामुळे अननसाचा ज्यूस पिण्याऐवजी जेव्हा तुम्ही अननसाचे छोटे-छोटे तुकडे चावून चावून खाता तेव्हा त्याचा तोंडात तयार झालेल्या रसामुळे दातांना आवश्यक ते पोषण मिळते.

सफरचंद

सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम असते, जे तुमचे हृदय निरोगी ठेवते. सफरचंदांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स कर्करोग रोखण्यास मदत करतात. पण ते फक्त संपूर्ण खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र, त्याचे ज्यूस करून प्याल तर यामुळे रक्तातील साखर वाढू शकते, म्हणून त्याचा ज्यूस पिणे टाळा, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in