
Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे (funny jokes in Marathi )आहेत.
आनंद घ्या 'या' जोक्सचा
> एक भिकारी देवाला म्हणतो…
हे देवा मला खाण्यासाठी असं काहीतरी दे जे,
खाल्ल्यावरसुद्धा संपले नाही पाहिजे…
देव – हे घे पूर्ण एक चिंगम…
> डॉक्टर – बाई, तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात
आणि
सगळेच रिपोर्ट नॉर्मल आले आहेत…
काही कळतच नाहीये,
यांना नेमकं काय झालंय ते…?
बाई (काळजीच्या सुरात) – अहो डॉक्टर साहेब, ते
पोस्ट मार्टम का काय असत, ते तरी करून पहा एकदा…!!!
(पेशंट फरार आहे…)
> माझे काही मित्र एवढे रिकामटेकडे आहेत
कि, बसल्या बसल्या
मुंग्यांचा रस्ता अडवून बोलतात…
आता कुठून जातेस बघतोच…!!!
जोक स्त्रोत - सोशल मीडिया
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)