
हिंदू चांद्र-सौर आणि अमांत (अमावस्येनंतर प्रारंभ) कालगणनेनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला नवीन वर्ष साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशातील विविध प्रांतांमध्ये वेगवेगळ्या नावाने ही दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण गुढी पाडवा या नावाने साजरा केला जातो. धार्मिक, आध्यात्मिक आणि निसर्गाशी जवळीक साधणे यामुळे या सणाला फार मोठे महत्त्व आहे. जाणून घेऊया गुढी पाडवा 2025 नेमका कधी साजरा केला जाणार. काय आहे योग्य तारीख आणि कधी उभारायला हवी गुढी.
गुढी पाडवा तिथीचा संभ्रम काय आहे?
चांद्र कालगणना तिथी नुसार असते. कारण ही कालगणना चंद्राच्या भ्रमणावर आधारित असते. त्यामुळे अनेक वेळा या तिथी प्रचलित ग्रेगोरियन कालगणनेप्रमाणे दोन दिवसांमध्ये विभागून येते. जेव्हा अशा प्रकारे तिथी दोन दिवसात विभागून येते तेव्हा सण केव्हा साजरा करावा याविषयी संभ्रम निर्माण होतो.
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला गुढी पाडवा साजरा केला जातो. यंदा ही तिथी २९ आणि ३० मार्च अशी विभागून येत आहे. प्रतिपदा तिथी २९ तारखेला सायंकाळी ४ वाजून २७ मिनिटांनी सुरू होत आहे. तर ३० मार्च ला दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांनी ही तिथी समाप्त होत आहे.
गुढी उभारून सण केव्हा साजरा करावा?
कालगणनेप्रमाणे जेव्हा अशा पद्धतीने एक तिथी दोन दिवसात विभागून येते तेव्हा सूर्योदयाला महत्त्व देण्यात येऊन ज्या दिवशी सूर्योदय आहे तेव्हा सण साजरे करून पूजा विधी करण्यात येतात. २९ तारखेला तिथी सायंकाळी ४ नंतर सुरू होत असल्याने सूर्योदयावेळी ही तिथी नसणार. तर ३० मार्चला दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत प्रतिपदा तिथी असणार आहे. याचाच अर्थ सूर्योदयावेळी तिथी ३० मार्चला आहे. त्यामुळे गुढी ३० मार्चला गुढी उभारून या दिवशीच सण साजरा करायचा आहे.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)