Happy Mother's Day: मातृ दिनी आईला पाठवा 'हे' प्रेमळ मराठमोळे शुभेच्छा संदेश!

Mother's Day Wishes 2024: आज १२ मे रोजी मातृदिन साजरा होत आहे. आजच्या या खास दिनी तुमच्या आईला छान शुभेच्छा मेसेज पाठवून स्पेशल फील करवा. यासाठी आम्ही दिलेले निवडक संदेश पाठवू शकता.
Freepik
Freepik

Mothers Day Wishes, Messages, Quotes in Marathi: आई हीच आपली पहिली गुरू, पहिली मैत्रीण आणि सगळंच असते. आपण तिच्यासमोर काहीही बोललो तरी ती आपल्याला कधीच जज करत नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला दुखापत किंवा वेदना होतात तेव्हा आपल्या तोंडातून पहिला शब्द बाहेर पडतो तो म्हणजे आई. आई शिवाय जग नसतं. आईचे प्रेम प्रत्येक नात्याच्या आधी आणि वर असते. आईच्या प्रेमाचा आदर आणि कौतुक करण्यासाठी मदर्स डे साजरा केला जातो. यंदा मातृदिन १२ मे रोजी साजरा होत आहे. आज तुमच्या आईचे तिच्या प्रेम, समर्पण आणि सहवासाबद्दल धन्यवाद आणि प्रेमाचे काही शब्द बोला. यासाठी आम्ही मातृदिनाच्या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, ज्या पाठवून तुम्ही तुमच्या आईला तुमचं प्रेम व्यक्त (Happy Mothers Day 2024 Wishes, Status, Images, Quotes, Messages & Greetings) करू शकता.

पाठवा हे शुभेच्छा संदेश

> खरं प्रेम कसं करावं

ते आईकडून शिकावं

मुलांना काहीच न मागता

त्यांना फक्त देत राहावं

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

> आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी

जिने केला रात्रीचा दिवस,

त्या माऊलीसाठी साजरा करूया

मातृदिनाचा हा सुंदर दिवस

मातृदिनाच्या शुभेच्छा!

> आ म्हणजे आत्मा

ई म्हणजे ईश्वर

आणि या ईश्वराचा आत्मा जिच्यात आहे

त्या आईविना सारे जग आहे नश्वर

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

> पहिले पाऊल घरात टाकल्यापासून

तुमचा आहे डोक्यावर हात

सासू म्हणून नाही तर आई म्हणूनच ठेवला मायेचा हात

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

> तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी

कसे हे फेडू ऋण तुझे, असंख्य जन्माचा कृतज्ञ मी

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in