National Brother's Day 2024: भाऊ म्हणजे भक्कम आधार, भावाला पाठवा या खास दिनाच्या शुभेच्छा!

Happy National Brother's Day : दरवर्षी २४ मे हा दिवस राष्ट्रीय बंधू दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भावांबद्दल प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.
National Brother's Day 2024: भाऊ म्हणजे भक्कम आधार, भावाला पाठवा या खास दिनाच्या शुभेच्छा!
Freepik

National Brother's Day Wishes in Marathi: बहीण भावाचं किंवा भावा भावांचा नातं फारच वेगळं असतं. बहिणींसाठी भाऊ हा जीवनाचा भक्कम आधार असतो, मग तो लहान असो किंवा मोठा भाऊ. बहिणी आपल्या मनातील प्रत्येक आनंद आणि दु:ख आपल्या भावांसोबत सहज शेअर करू शकते. दरवर्षी २४ मे हा राष्ट्रीय बंधू दिन २०२४ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भावांबद्दल प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. आपल्यासाठी नेहमी उभ्या असणाऱ्या या व्यक्तीला आजच्या राष्ट्रीय बंधू दिनला आवर्जून शुभेच्छा संदेश (Happy Brother's Day Wishes, Messages )पाठवून आपलं प्रेम व्यक्त करा. तुमच्या भावाला आवर्जून मराठमोळे शुभेच्छा संदेश (National Brother's Day 2024 Wishes, Status, Images, Quotes, Messages & Greetings) पाठवा.

पाठवा हे शुभेच्छा संदेश

> लाखात आहे एक माझा भाऊ,

बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ,

ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

> आनंदाची सुखाची बरसात तुझ्यावर सदा होवो

सुख समाधान तुझ्या पायासी लोळो

ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!!

> आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवीन कलाटणी ठरो,

तुझ्या राहिलेल्या कामाना दुजोरा मिळो

ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

> तुझं आयुष्य असो समृद्ध,

सुखांचा होवो वर्षाव

ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

> बंधू दिनाच्या शुभेच्छा, भाऊ!

तू माझ्या आयुष्यातला खरा आशीर्वाद आहेस

Happy National Brother's Day

(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)

logo
marathi.freepressjournal.in