Happy Valentine Day 2024: प्रेमळ मेसेजेसद्वारे आपल्या जोडीदाराला द्या व्हॅलेन्टाईन्स डेच्या 'या' खास शुभेच्छा!

14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करुन प्रेम व्यक्त करतात.आज व्हॅलेंटाईन दिनानिमित्त आपल्या जोडीदाराला प्रेमाच्या शुभेच्या द्या.
Happy Valentine Day 2024: प्रेमळ मेसेजेसद्वारे आपल्या जोडीदाराला द्या व्हॅलेन्टाईन्स डेच्या 'या' खास शुभेच्छा!

मागच्या आठवड्यात व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि या वीकमध्ये प्रत्येक दिवस हा खूपच खास असतो. दरवर्षी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या काळात व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यात येतो. या सात दिवसांत आपल्या पार्टनरला गुलाब, चॉकलेट, गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करतात. तर अनेकजण 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करुन प्रेम व्यक्त करतात.आज व्हॅलेंटाईन दिनानिमित्त आपल्या जोडीदाराला प्रेमाच्या शुभेच्या द्या.

अशा प्रकारे देऊ शकता शुभेच्या-

तुझ्या प्रेमाचा रंग तो, अजूनही बहरत आहे, शेवटच्या क्षणापर्यंत, मी फक्त तुझीच आहे.. Happy Valentines Day..!

बंध जुळले असता, मनाचं नातंही जुळायला हवं, अगदी स्पर्शातूनही, सारं सारं कळायला हवं.. Happy Valentines Day..!

डोळ्यातल्या स्वप्नाला, कधी प्रत्यक्षातही आण, किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण.. Happy Valentines Day..!

असंच कधी तुला, माझ्या आठवणीत, हसताना पाहायचंय, जीवनाचं सुंदर स्वप्न मला, आता तुझ्याचसोबत जगायचंय.. Happy Valentines Day..!

संगीत जुनच आहे, सूर नव्यानं जुळत आहेत, मनही काहीसं जुनच, तेही नवी तार छेडत आहेत.. Happy Valentines Day..!

काळोखाच्या वाटेवर चालताना, हातामध्ये तुझाच हात, धडपडत्या आयुष्याला सावरताना, आता फक्त तुझीच साथ.. Happy Valentines Day..!

एकटाच चालतो आहे आजवरी, हात हाती घेशील का? घेईन उंच भरारी तुजसवे, साथ मज देशील का? Happy Valentines Day..!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in