शरीरातील हिमोग्लोबीन कमी झालंय?, 'या' गोष्टी नक्की खा

शरीरातील ऑक्सीजनच्या प्रवाहाला संतुलित करण्याचे काम हिमोग्लोबीन करते. फुप्फुसांच्या आतपर्यंत ऑक्सीजन पोहोचविण्याचे काम त्यांना करावे लागते.
 शरीरातील हिमोग्लोबीन कमी झालंय?, 'या' गोष्टी नक्की खा

हिमोग्लोबीन हा शरीरातील सर्वांत महत्वाचा घटक आहे. रक्त कोशिकांमध्ये उपलब्ध असलेले लोहयुक्त प्रोटिन म्हणजे हिमोग्लोबीन. शरीरातील ऑक्सीजनच्या प्रवाहाला संतुलित करण्याचे काम हे प्रोटिन करतात. फुप्पुसांच्या आतपर्यंत ऑक्सीजन पोहोचविण्याचे काम त्यांना करावे लागते.

सफरचंद - सर्वसाधारणपणे डॉक्टर तुम्हाला दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. यात मोठ्या प्रमाणावर आयर्नची मात्रा असते. त्यामुळे हिमोग्लोबीनचा स्तर वाढतो. पोटाच्या समस्यांपासूनही सफरचंद मुक्तता देते.

डाळींब - रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी डाळींबाचे दाणे सर्वांत उपयुक्त ठरतात. त्याच्या नियमित सेवनामुळे रक्तातील हिमोग्लोबीनची कमतरता सहजपणे दूर करता येते. डाळींबात आयर्न, कॅल्शियम, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, फायबरसारखे गुण असतात. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण सहज वाढते.

आवळा - आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाणात चांगले असते. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण झपाट्याने वाढते. शरीरामधील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करायला हवा.

मनुके - शरीरामधील अशक्तपणा दूर करण्यासाठी मनुके खूप फायदेशीर आहेत. मुनक्यामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते.

पालक - पालकमध्ये ए, सी, ई, के आणि बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात असतात. आरोग्याच्या सर्व समस्या टाळण्यासाठी आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये पालकाचा समावेश करा.

गुळ - आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये गुळाचा समावेश करावा. गुळामध्ये लोह तसेच व्हिटॅमिन बी 12, बी 6, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यांसारखे पोषक घटक असतात.

हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दररोज व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते. त्यामुळे शरीरात स्वत:हून हिमोग्लोबीन तयार होते. ज्या लोकांना रक्ताची कमतरता भासते त्यांना बऱ्यापैकी व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.

हिमोग्लोबीनची कमतरता अनेक प्रकारचे त्रास निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते. त्याचे संतुलन राखणे गरजेचे आहे.

logo
marathi.freepressjournal.in