शिळे अन्न खाण्याची सवय आहे? 'या' सवयीचे होतात शरीरावर दुष्परीणाम

आहारात जर नेहमीच शिळ्या पदार्थाचा समावेश केला जात असेल तर हे आपल्या शरीरासाठी जास्त हानिकारक ठरू शकते,
शिळे अन्न खाण्याची सवय आहे? 'या' सवयीचे होतात शरीरावर दुष्परीणाम

बऱ्याचदा उरलेले अन्न आपण वाया जाऊ नये म्हणून पुन्हा गरम करून खातो. मात्र याचे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. आहारात जर नेहमीच शिळ्या पदार्थाचा समावेश केला जात असेल तर हे आपल्या शरीरासाठी जास्त हानिकारक ठरू शकते, या सवयीमुळे तुम्हाला पोट दुखीच्या, विषबाधा, यासारख्या समस्यांना सामोरे जायला लागू शकते. पोट दुखी हि साधारण समस्या नाही. कदाचित त्याचे मोठ्या आजारामध्ये रूपांतर होऊ शकते. त्यामुळे शक्यतो ज्या लोकांना पोटदुखीच्या समस्या जास्त प्रमाणात आहेत, त्या लोकांनी शिळ्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करू नये. जाणुन घेऊयात शक्यतो कोणकोणते पदार्थ शिळे झाल्यावर खाणे टाळावे.

बटाटा —बटाटा शिजवल्यानंतर बराच काळ जर तो तसाच राहिला तर मात्र बटाट्यामध्ये काही प्रमाणात कोस्टीलम बोटुलिझम या बॅक्टरीयाचा जास्त फैलाव होतो. बटाटा खाताना काळजी घेतली पाहिजे. आपल्या आहारात शिळा बटाटा अजिबात ठेवू नये, शिऴ्या बटाट्याच्या सेवणाने डोळ्यांना कमी दिसणे, श्वास कमी प्रमाणात घेणे अश्या समस्यांना सामोरे जावे लागते.

पालक —पालकची भाजी आरोग्यासाठी महत्वाची तर आहेच. पण शिळी पालक भाजी आहारात ठेवली तर मात्र पोटाच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे पालक ची भाजी शिजवताना सुद्धा जास्त प्रमाणात शिजवली जाऊ नये याची काळजी घ्यावी.

शिळा भात —बऱ्याच जणांना शिळा भात सकाळी फोडणी देऊन खाण्याची आवड असते. मात्र शिळा भात खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने अजिबातच योग्य नाही. शिळा भात खाल्ल्याने विषबाधा होण्याचे प्रमाण जास्त असते.

तेलकट अन्न —आहारात तेलकट अन्नाचा समावेश केला तर मात्र खोकला वगैरे अश्या समस्या जाणवू शकतात. तेलकट अन्न खाण्याने घसा हा पॅक होऊन जातो.

अंडी — अंडी आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी ते शिळे खाणे कायम टाळावे. अंडी शिजल्यानंतर त्यामध्ये असलेले साल्मोनेला बॅक्टेरिया इतर प्रकारचे बॅक्टेरिया झपाट्याने विकसित करण्यास मदत करतात. यामुळे पोटाचे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

चिकन—चिकनमध्ये साल्मोनेला नावाचे बॅक्टेरिया असतात, जे शिजवल्यानंतर हानिकारक बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे 2 तासांपेक्षा जास्त वेळेनंतर शिजवलेले चिकन खाऊ नये.

logo
marathi.freepressjournal.in