व्यायामानंतर करा हेल्‍दी ब्रेकफास्‍ट; हे '5' पराठे आहेत शरीरासाठी पोषक

थोडा व्यायाम करून व्यवस्थित हेल्‍दी ब्रेकफास्‍ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
व्यायामानंतर करा हेल्‍दी ब्रेकफास्‍ट; हे '5' पराठे आहेत शरीरासाठी पोषक

सकाळी उठल्यावर नाष्ट्यासोबत चहा – कॉफी घेतल्याने मेटाबॉलिज्‍म रेट कमी होतो आणि तुमचे वजन वाढू शकते. पण जर थोडा व्यायाम करून व्यवस्थित हेल्‍दी ब्रेकफास्‍ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. आम्ही काही हेल्‍दी पराठे तुम्हाला सुचवत आहोत, हे पराठे पोट तर फूल करतील सोबत शरीराला पोषकसुद्धा आहेत.

कांदा पराठा
कांद्यामध्ये कोलेजन आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते. कांद्याचा पराठा (पालक पराठा) केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर एकूणच आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठीही खूप चांगला मानला जातो, त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही कांदा पराठा खावा.

पालक पराठा
पालकामध्ये व्हिटॅमिन बी , ई आणि के आणि पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात, जे निरोगी शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. याशिवाय यामध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे तुमचे पोट तासनतास भरलेले राहते. यामध्‍ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी आहे आणि ते अनेक पोषक तत्वांनी भरलेले आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील जास्त असतो ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही.

मेथी पराठा
मेथीमधे फायबर असते जे पचनसंस्था सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास खूप फायदेशीर आहे. हे आपल्या त्वचेसोबतच केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते.
मेथीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक शरीराला अनावश्यक हानिकारक पदार्थांपासून मुक्त होण्यास मदत करतात.
मेथीचे पराठे वजन कमी करण्यासही खूप मदत करतात.

बीटरूट पराठा
बीटरूट व्हिटॅमिन बी ने भरपूर असते सोबतच ह्यात असणारे कॉपर, झिंक, फॉस्फरस,
सोडियम सारखे मिनरल शरीरासाठी खूप फायदेशीर असतात . ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. उत्तम आहार आणि थोडीशी कसरत तुमचं वजन नक्की कमी शकतात.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in