
आपल्याकडे साधारणपणे कढीपत्त्याचा उपयोग जेवणाची चव वाढवणे आणि सुगंधासाठी केला जातो. मात्र, कढीपत्ता खूप बहुगुणी आहे. याच्या नियमित सेवनाने कितीतरी आजार लांब पळतात. लहान बाळापासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्याच आरोग्यासाठी कढीपत्ता अतिशय उपयुक्त आहे. याशिवाय त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी कढीपत्त्याचा उपयोग होतो. जाणून घ्या कढीपत्त्याचे हे महत्त्वाचे फायदे...
कढीपत्त्यामध्ये अ जीवनसत्त्वासह प्रथिने आणि कर्बोदकांचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे कढीपत्ता हा एकाच वेळी अ जीनवसत्त्व, प्रथिने आणि कर्बोदकांचे भंडार आहे. अ जीवनसत्त्व डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कढीपत्त्याचा आहारात समावेश करायला हवा.
लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास
लहान मुलांच्या पोटात अनेक वेळा जंत किंवा कृमी तयार होतात. यामुळे त्यांना पोटाचे विकार जडतात. अशा वेळी लहान मुलांना कढीपत्त्याची पाने वाटून गूळ आणि मधासह त्याच्या गोळ्या तयार करून दोन दोन गोळ्या द्याव्या. लगेच फरक पडतो.
मूळव्याधासाठी उत्तम औषध
मूळव्याध झाल्यास अनेकांना रक्त पडण्याचा त्रास असतो. अशावेळी कढीपत्त्याच्या पानांचा रस प्यायल्यास रक्त पडण्याचे थांबते.
तोंडाला चव येते
अनेक वेळा वेगवेगळ्या औषधांच्या सेवनाने तोंडाची चव जाते. जेवण करावेसे वाटत नाही. अशावेळी कढीपत्त्याचे सेवन फायदेशीर ठरते. यामुळे तोंडाला चव येते आणि भूक लागते.
पोटात मुरडा येणे थांबतो
पोटात मुरडा येत असेल तर अशावेळी कढीपत्त्याची पाने चावून खावीत. यामुळे लगेच आराम मिळतो.
त्वचेसाठी उपयुक्त
त्वचेला खाज सुटणे, पुरळ उठणे, त्वचेला खाज सुटणे इत्यादी आजारात कढीपत्त्याचा पानांचा रस अंगावर चोळावा. नंतर आंघोळ करावी. यामुळे त्वचेचे त्रास कमी होतात.
केसांसाठी वरदान
कढीपत्ता हा केसांसाठी वरदान आहे. केस धुताना शिकाकाई, आवळा, रिठासोबत कढीपत्त्याची पाने उकळावी. या पाण्याने स्ना केल्यास केस स्वच्छ, मऊ होतात. तसेच खोबऱ्याच्या तेलात कढीपत्त्याची पाने उकळून त्याचे तेल केसांना लावल्यास केस गळती लगेच थांबते. केस मजबूत होतात.
पायाच्या भेगांसाठी लेप
पायांना भेगा पडल्यास पाय स्वच्छ धुवून कढीपत्त्याच्या पानांचा कल्प तयार करून तो भेगांमध्ये लावावा. पायांच्या भेगा लगेच भरून येतात.