प्रथिनांचा खजिना आहे मूग; दररोजच्या आहारात करा समावेश, आरोग्यासाठी होतात 'हे' फायदे

प्रथिने म्हणजे शरिराला पेशींची वाढ होणे, दुरुस्ती आणि योग्यरित्या कार्य करणे यासाठी आवश्यक असलेले पोषक तत्व असतात. प्रथिने वेगवेगळ्या प्रकारची असतात. अमिनो आम्लांपासून ती बनलेली असतात. शरिराला आवश्यक असलेली ही प्रथिने आपल्याला योग्य आहारातून मिळतात. मूग हा प्रथिनांचा खजिना आहे. त्यामुळे मुगाचा नियमितपणे आहारात समावेश असणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
प्रथिनांचा खजिना आहे मूग; दररोजच्या आहारात करा समावेश, आरोग्यासाठी होतात 'हे' फायदे
Freepik
Published on

प्रथिने म्हणजे शरिराला पेशींची वाढ होणे, दुरुस्ती आणि योग्यरित्या कार्य करणे यासाठी आवश्यक असलेले पोषक तत्व असतात. प्रथिने वेगवेगळ्या प्रकारची असतात. अमिनो आम्लांपासून ती बनलेली असतात. शरिराला आवश्यक असलेली ही प्रथिने आपल्याला योग्य आहारातून मिळतात. मूग हे प्रथिनांचा खजिना आहे. त्यामुळे मुगाचा नियमितपणे आहारात समावेश असणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

मुगाचे गुणधर्म

मूग हे पौष्टिक कडधान्य असून यामध्ये प्रथिनांसह फायबर देखील भरपूर प्रमाणात असतात. मूग हे थंड गुणाचे असून पचायला हलके असते. मुगाच्या अनेक पदार्थ करून खाता येतात. मूग हे हिरवे, पिवळे आणि काळ्या रंगाचे देखील असतात. सर्वांचे गुणधर्म आणि पौष्टिक तत्व वेगवेगळे असतात. हिरवे मूग हे सर्वात जास्त पौष्टिक आणि फायदेशीर असते. यामध्ये जीवनसत्त्व अ आणि ब देखील असते. मुगाच्या टरफलात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह हे घटक देखील असतात. त्यामुळे मुगाला जीवरक्षक असे देखील म्हणतात.

हिरवे मूग खाण्याचे फायदे

मूग कफ, पित्त व रक्तासंबंधी विकारात फार उपयुक्त आहेत. मुगाच्या सेवनाने पोटात गॅस तयार होत नाही म्हणजेच जेव्हा तुम्हाला पोटात गॅस होण्याची समस्या असते. तेव्हा तुम्ही मुगाचे सेवन केल्यास त्याचे पोटासाठी चांगले फायदे होतात.

ज्वर झाला असेल तर मुगाच्या किंवा रानमुगाच्या पानांचा काढा प्यावा. जीर्णज्वरात ताकद भरून येण्याकरिता व चांगल्या झोपेकरिता मुगाच्या पानांचा काढा उपयुक्त ठरतो.

मूग हे अंकुरित करून खाल्ल्यास म्हणजेच मोड आलेले मूग हे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतात.

पिवळे मूग

पिवळे मूग भाजून त्याचे तयार केलेले पीठ पौष्टिक असते. चांगल्या तुपात पिवळ्या मुगाचे पीठ भाजून खडीसाखर घालून केलेले लाडू आरोग्यासाठी उत्तम असतात. कुश मुले, दुपारी उशिरा जेवणारी मंडळी यांनी सकाळी चहाऐवजी चांगल्या तुपावर भाजलेल्या मुगाच्या पिठाचे लाडू खावे. तसेच बाळंतिणीसाठी हे लाडू अतिशय पौष्टिक असतात.

या तक्रारींवर मूग उपयुक्त

आमवात, आम्लपित्त, डोकेदुखी, अर्धांगवात, संधिवात, अल्सर, तोंड येणे, त्वचेचे विकार, कावीळ, जलोदर, सर्दी-पडसे, खोकला, दमा, स्वरभंग या तक्रारीवर मूग अत्यंत उपयुक्त आवश्यक अन्न आहे.

मुगाचे पदार्थ

मुगाचे अनेक पदार्थ करता येतात. मुगाची उसळ, मुगाच्या पिठाच्या भाकऱ्या, मुगाची खिचडी, मुगाचे धिरडे असे अनेक पदार्थ हिरव्या मुगापासून करता येतात.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in