Health Care: जीवघेणे ठरू शकणारे आणि डासांमार्फत संक्रमित होणारे पाच आजार

Diseases transmitted by mosquitoes: डासांमुळे होणाऱ्या आजारांवर वेळीच उपचार न केल्यास प्राणघातक ठरू शकतात.
Health Care: जीवघेणे ठरू शकणारे आणि डासांमार्फत संक्रमित होणारे पाच आजार
Published on

डास हे आकाराने लहान असले तरी, त्यांच्या घातक रोग प्रसारित करण्याच्या क्षमतेमुळे पृथ्वीवरील सर्वात धोकादायक जीवांपैकी एक आहेत.विशेषत: उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय प्रदेशात हे लहान कीटक दरवर्षी लाखो मृत्यूस कारणीभूत ठरतात. येथे डासांमुळे होणारे पाच रोग दिले आहेत, जे वेळीच उपचार न केल्यास प्राणघातक ठरू शकतात. याबद्दल अधिक जाणून घेऊयात अजय शाह प्रयोगशाळा,न्युबर्ग येथील व्यवस्थापकीय संचालक, डॉ. अजय शाह यांच्याकडून...

१. मलेरिया

मलेरिया हा डासांमुळे होणारा सर्वात परिचित रोगांपैकी एक आहे, जोप्लास्मोडियमपरजीवीमुळे होतो. हा संक्रमित असलेल्या मादीअनोफेलेसडासाच्या चाव्यामुळे मानवांमध्ये प्रसारित होतो. याची लक्षणे अतिप्रमाणात ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी, आणि स्नायूंमध्ये वेदना यांचा समावेश होतो. योग्य उपचार न केल्यास मलेरिया गंभीर गुंतागुंती निर्माण करतो. जसे की, रक्ताल्पता, अवयव निकामी होणे, आणि मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो.

प्रतिबंध आणि उपचार:

•कीटकांना पळवून लावणारे स्प्रेवापरा आणि मच्छरदाणीखाली झोपा.

•अति जोखमीच्या भागात प्रवास करताना मलेरियाविरोधी औषधे घ्या.

•लक्षणे उद्भवल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्या, कारण लवकर निदान आणि उपचार महत्त्वाचे आहेत.

२. डेंग्यू ताप

डेंग्यू ताप हाडेंग्यूविषाणूमुळे होतो, जो प्रामुख्यानेएडीस एजिप्तीडासांद्वारे प्रसारित होतो. हा रोग उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतो आणि त्यामध्ये अतिप्रमाणात ताप, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना, सांधे आणि स्नायू दुखणे, पुरळ, आणि रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे असतात. गंभीर प्रकरणांमध्येप्राणघातक अश्या डेंग्यू हिमरेज ताप किंवा डेंग्यू शॉक सिंड्रोममध्ये बदलू शकतात.

प्रतिबंध आणि उपचार:

•कीटकांना पळवून लावणारे स्प्रेवापरा आणि संरक्षक कपडे घालून डासांच्या चाव्यापासून बचाव करा.

•डासांच्या प्रजननासाठी पोषक स्थळे, जसे की साचलेले पाणी, नष्ट करा.

•लक्षणे अधिक गंभीर झाल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या, कारण सहायक उपचार महत्त्वाचे आहेत.

३. झिका विषाणू

झिकाविषाणू, जोएडीसडासांद्वारे प्रसारित होतो, त्याच्या नवजात बाळांमध्ये निर्माण होणारा जन्मदोष, विशेषत: सूक्ष्म मस्तिष्कविकार याच्याशी असलेल्या संबंधामुळे जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेत आहे. झिका संसर्गाची लक्षणे सामान्यत: सौम्य असतात, ज्यामध्ये ताप, पुरळ, सांधेदुखी, आणि डोळ्यांची जळजळ यांचा समावेश होतो. परंतु गर्भवती महिलांसाठी आणि त्यांच्या गर्भासाठी हा रोग मोठा धोका निर्माण करतो.

प्रतिबंध आणि उपचार:

•विशेषत: गर्भधारणेदरम्यान डासांच्या चाव्यापासून बचाव करा.

•संक्रमित असल्यास सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा किंवा लैंगिक क्रियेपासून दूर राहा.

•यासाठी कोणताही विशिष्ट उपचार उपलब्ध नाही, त्यामुळे सहायक काळजी आणि लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

४. पिवळा ताप

पिवळा तापहा एक विषाणूजन्य रोग आहे, जोएडीसआणिहेमॅगोगसडासांद्वारे प्रसारित होतो. याची सुरुवातीची लक्षणे ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी, पाठदुखीआणि स्नायूंमध्ये वेदना अशी असू शकतात. गंभीर प्रकरणांमध्ये, हा रोग विषयुक्त अवस्थेत जातो, ज्यामुळे पिवळसरपणा, रक्तस्त्राव, अवयव निकामी होणेआणि मृत्यू होऊ शकतो.

प्रतिबंध आणि उपचार:

•लसीकरण हा सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे.

•स्थानिक भागात डास चावण्यापासून बचाव करा.

•यासाठी कोणताही विशिष्ट उपचार नाही, परंतु सहायक काळजी जीवन वाचवू शकते.

५. चिकुनगुनिया

चिकुनगुनियाहा एक विषाणूजन्य रोग आहे, जोएडीसडासांद्वारे पसरतो. यामध्ये ताप, तीव्र सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायूंच्या वेदना, पुरळ, आणि थकवा अशी लक्षणे असतात. चिकुनगुनिया सहसा प्राणघातक नसला तरी, तीव्र सांधेदुखी काही महिने किंवा वर्षे टिकू शकते, ज्यामुळे तब्ब्येतीची गुणवत्ता खूपच कमी होऊ शकते.

प्रतिबंध आणि उपचार:

•डासांच्या चाव्यापासून बचावासाठी डासांना पळवून लावणारे स्प्रेआणि जाळ्या वापरा.

•यासाठी कोणताही विशिष्ट प्रतिजैविक उपचार उपलब्ध नाही, त्यामुळे वेदना कमी करण्यासाठी सहायक उपचार आवश्यक आहेत.

डास हे लहान वाटू शकतात, परंतु ते घातक रोगांचे वाहक आहेत, जे जागतिक आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करतात. डासांच्या चाव्यांपासून बचाव करणे आणि डासांच्यासंख्येवर नियंत्रण ठेवणे ही या जीवघेण्या रोगांचा धोका कमी करण्यासाठी अत्यावश्यक पावले आहेत. जर तुम्ही अशा भागात राहता किंवा प्रवास करत असाल जिथे हे रोग सामान्य आहेत, तर आवश्यक ती खबरदारी घ्या आणि लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.

logo
marathi.freepressjournal.in