

वाढत्या वयासोबत शरीराची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर शरीरातील प्रत्येक अवयवाची कार्यप्रणाली वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देते. चाळीशीनंतर, मेटबॉलिजम रेट मंदावणे, हार्मोनल असंतुलन वाढणे, हृदयरोग, मधुमेह आणि हाडे कमकुवत होण्याचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, या वयात आरोग्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. म्हणूनच ,तज्ज्ञांच्या मते, वयाच्या चाळीशीनंतर कोणत्या वाईट सवयी लगेच सोडल्या पाहिजेत, जाणून घ्या.
चांगली झोप घेणे
तज्ज्ञांच्या मते, ४० ते ६० वयोगटातील लोकांना दररोज ९ तासांची चांगली झोप आवश्यक आहे. चांगल्या झोपेमुळे शरीराची रिकव्हरी आणि हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते. तसेच, ७ तासांपेक्षा कमी झोपल्याने टाइप २ मधुमेहाचा धोका ९ टक्क्यांनी वाढतो. झोपेच्या अभावामुळे, पोटात चरबी जमा होणे, रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होणे आणि लवकर थकवा येणे अशा समस्या जाणवू शकतात.
स्ट्रेंथ ट्रेनिंग करा
वयानुसार स्नायूंची ताकद कमी होत जाते म्हणून ४० नंतर स्ट्रेंथ ट्रेनिंगकडे दुर्लक्ष करु नका. चाळीशीनंतर, प्रत्येक दशकात शरीरातील स्नायू ३ ते ५ टक्क्यांनी कमी होतात.यासाठी, स्ट्रेंथ ट्रेनिंग आवश्यक आहे.आठवड्यातून किमान दोनदा स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने हाडे मजबूत होतात. तसेच हृदयरोगाचा धोका १७ टक्क्यांनी कमी होतो.
अनहेल्दी पदार्थ खाणं टाळा
चाळीशी ओलांडल्यानंतर आहाराची योग्य काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. प्रोसेस्ड फूड, चिप्स आणि सोडा यांसारखे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि अॅसिडिटी, अपचन, वजन वाढणे आणि हृदयरोग यासारख्या आजारांचा धोका वाढतो. या स्नॅक्समध्ये फायबरचे प्रमाण खूप कमी असते. ज्यामुळे पोट आणि आतड्यांचे आरोग्य बिघडते आणि आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोका २० टक्क्यांनी वाढतो.
ब्लड टेस्ट करा
शरीरात काही लक्षणे नसतानाही नियमित ब्लड टेस्ट करणे आवश्यक आहे. या चाचण्यांमुळे उच्च कोलेस्ट्रॉल, प्री-डायबिटीज आणि थायरॉईड समस्यांसह अनेक लपलेल्या समस्या आढळू शकतात. ज्यामुळे काही आजारांवर वेळीच उपचार केले जाऊ शकतात.
ताण कमी करा
याव्यतिरिक्त, वाढत्या वयासोबत, जास्त ताणतणावात राहणे टाळा. दीर्घकालीन ताणामुळे शरीरात कॉर्टिसोलची पातळी वाढते, रक्तदाब वाढतो आणि टाइप २ मधुमेहाचा धोका ४५ टक्क्यांपर्यंत वाढतो.