
पचनासंबंधी अनेक जणांना अनेक प्रकारच्या तक्रारी असतात. यामध्ये वारंवार अॅसिडिटी होणे, बद्धकोष्ठता, अनियमित शौचाला जावे लागणे, जेवणानंतर पोट फुगणे, पोट ब्लोटिंग होणे इत्यादी. तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्या आहेत का? या समस्यांसाठी तुम्ही ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, आयुर्वेदिक अशा सर्व प्रकारचे उपचार घेतले आहेत. मात्र, तरीही हे त्रास तुम्हाला कायमच होतात. यामुळे तुमच्या कामावर देखील परिणाम होत आहे? तर मग ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. संपूर्ण माहिती वाचा...
स्वतःचे निरीक्षण करा
पचनासंबंधीचे अनेक विकार हे तुमच्या जीवनशैलीशी निगडीत आहेत. तुम्ही आहारात कोणते अन्न समाविष्ट करता इथपासून ते तुम्ही अन्न कशा प्रकारे खाता (eating habits) पचनासंबंधी अनेक जणांना अनेक प्रकारच्या तक्रारी असतात. यामध्ये वारंवार ॲसिडिटी होणे, बद्धकोष्ठता, अनियमित शौचाला जावे लागणे, जेवणानंतर पोट फुगणे, पोट ब्लोटिंग होणे इत्यादी. तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्या आहेत का? इथपर्यंतच्या सर्व गोष्टी यामध्ये अंतर्भूत होता. उपचार करूनही जर पचनासंबंधीचे विकार दूर होत नसेल तर तुम्हाला स्वतःच्या जीवनशैलीतील चुका सुधाराव्या लागतील. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जेवणाच्या सवयीचे निरीक्षण करायला हवे. धावपळीच्या काळात अनेक वेळा आपण आहाराशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जेवणाचे नियम पाळत नाही. त्यामुळे नंतर अनेक समस्या निर्माण होतात.
जेवण कसे करावे?
सामान्यपणे जेवण जेवण्यापूर्वी जेवण हायजिन स्वच्छतेत बनवले आहे की नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. जेवणापूर्वी आणि जेवणानंतर पाणी पिणे टाळायला हवे. सामान्यपणे जेवणापूर्वी ४० मिनिटे आणि जेवणानंतर ४० मिनिटांनी पाणी प्यावे. जेवणापूर्वी हात धुवून मगच जेवण करावे. फळं खाताना साल नसलेली फळे धुवूनच खावीत. जेवण अतिशय शांतपणे करायला हवे.
तुम्ही खरेच एक घास ३२ वेळा चावता का?
जेवण करतानाचा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. जो भारतीय परंपरेत पूर्वापार चालत आला आहे. जुणे जाणते लोकही त्याचे नीट पालन करत असे. लहानपणी आपल्याला एक घास ३२ वेळा चावून खा असे शिकवण्यात येते. याचा अर्थ जेवण इतके बारीक चावून खा की ते अन्ननलिकेत गेल्यानंतर पचनास सुलभ होईल. मात्र, हल्ली आपले जीवन इतके धावपळीचे झाले आहे की ज्या पोटासाठी कमावतो ते भरण्यासाठीच आपल्याकडे अगदी अल्पसा वेळ असतो. तसेच आपण सातत्याने काही ना काही खात राहतो त्यामुळे देखील हे नियम अलीकडे पाळले जात नाही. मात्र, जेव्हा तुम्ही अन्न एकदम बारीक करून चावून चावून खात नाही तेव्हा पचनासंबंधीच्या तक्रारी निर्माण होतात. परिणामी बद्धकोष्ठ, अॅसिडिटी, गॅसेस होणे असे आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पचानासंबंधीच्या तक्रारींसाठी एकदा या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)