
होळी, रंगपंचमीचा सण रंगांचा, आगळ्यावेगळ्या ढंगाचा, वर्षाव करी आनंदाचा पण हा आनंद दुःखात बदलू शकतो जर रंग खेळल्यानंतर नीट काळजी घेतली नाही. सिंथेटिक रंगांनी त्वचेला होणाऱ्या अॅलर्जींबाबत आता अनेक जण जागरूक होऊ लागले आहेत. तसेच नैसर्गिक रंगांनी रंग खेळण्याकडे आता लोकांचा कल वाढला आहे. मात्र, तरी देखील त्वचेला लावलेला रंग जर लवकर सुटला नाही तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. होळी खेळल्यानंतर रंग काढण्यासाठी घरच्या घरी तुम्ही नैसर्गिक फेसपॅक करू शकतात. हे नैसर्गिक पॅक तुमच्या त्वचेला खोलवर स्वच्छ करतील.
गव्हाच्या पीठातील कोंड्याचा स्क्रब
गव्हाच्या पीठातील कोंडा हा उत्तम स्क्रब आहे. तुम्ही यामध्ये बेसन किंवा डाळींचे पीठ मिक्स करून तुम्ही छान पॅक तयार करू शकता. जोडीला यामध्ये हळद, दूध, गुलाब पाणी मिसळून छान पॅक तयार करू शकता. स्क्रब केल्याने त्वचेचा रंग लगेच सुटेल. त्यानंतर एलोवेरा जेलने मालीश करा.
मुलतानी मातीचा पॅक
मुलतानी माती हा सर्वोत्तम नैसर्गिक पॅक आहे. विशेष म्हणजे तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी हा पॅक सर्वोत्तम कोरडी त्वचा असणाऱ्यांनी हा पॅक लावू नये. मुलतानी मातीत गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर आणि त्वचेवर लावून ठेवावे. ५ ते १० मिनिटांनी गार पाण्याने चेहरा धुवावा. सर्व रंग निघून जाईल. विशेष म्हणजे तुम्ही केसांसाठी देखील, मुलतानी मातीचा पॅक तयार करू शकता.
बेसन पॅक
बेसन पॅक हा पारंपारिक पॅक आहे. ज्यामुळे त्वचा स्वच्छ होते. भारतात हजारोवर्षापासून आंघोळीसाठी बेसन पीठ वापरले जाते. हा पॅक बनवायला अतिशय सोपा असतो. बेसनात, दूध आणि लिंबाचा रस मिसळून पॅक बनवा. ज्यांना त्वचा चुरचुरत असेल त्यांनी लिंबू ऐवजी दह्याचा वापर करा. हा पॅक त्वचेला लावून ५ मिनिटे ठेवून द्या. नंतर हलक्या हात्याने स्क्रब करत हा पॅक काढून घ्या. नंतर कोमट पाण्याने स्कीन धुवून काढा.
काकडी
काकडीचा रस हा केवळ रंगांसाठीच नव्हे तर रंगांमुळे त्वचेला खोलवर पोहोचलेले अपायकारक गोष्टीही दूर करतो. काकडीच्या रसात एक चमचा अॅप्पल व्हिनेगर मिक्स करा. त्यात काही गुलाब पाण्याचे थेंब टाका. आता छान मिक्स करून हा पॅक चेहऱ्यावर लावा. थोडा वेळाने चेहरा छान धुवून टाका.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)