
होळी उत्सवासाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्याच्या परंपरा आहे. दिवाळीप्रमाणेच होळीलाही करंज्या, लाडू, अनारसे बनवण्याच्या परंपरा आहेत. होळीसाठी करंजी बनवताना या खास टिप्स
साहित्य
मैदा
बारीक रवा
चवीनुसार मीठ
थोडे तेल
दूध
खसखस
बारीक रवा
किसलेले खोबरे
पिठी साखर
वेलची पावडर
सुका मेवा
साठ्यासाठी
तूप
दोन चमचे कॉर्न फ्लोअर
सारण
पॅनमध्ये तेल टाकून खसखस भाजून घ्या.
रवा चांगला भाजून घ्या. भाजताना तो जळणार नाही याची काळजी घ्या.
रव्यात किसलेले खोबरे घाला. त्यात वेलची पूड, खसखस घाला, सोबत तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्सचे मिश्रण घाला.
सारण तयार होईल.
साठा कसा तयार करावा
एका भांड्यात तूप चांगले फेटून घ्या. यात दोन चमचे कॉर्न फ्लॉवर घाला. हा साठा गोळे करण्यासाठी लागेल.
करंजी कशी बनवावी
मैद्यात बारीक रवा घाला. चिमुटभर मीठ घाला. थोडे तेल टाका हे मिश्रण छान एकत्र करा. दुधात हे मिश्रण घट्ट मळून घ्या. ते भिजत ठेवा.
भिजत ठेवलेले करंजीचे पीठ चांगले मळून घ्या. त्याचे छोटे छोटे गोळे करून लाटून घ्या. त्यावर साठण लावा. नंतर ते कापून त्याचे पुन्हा गोळे करून घ्या.
या गोळ्यांच्या छान छोट्या पुऱ्या लाटून घ्या. त्यात छान सारण भरा. त्याच्या काठावर कापसाने दूध लावा.
करंजी व्यवस्थित बंद करा. अन्यथा तळताना सारण बाहेर येण्याची शक्यता असते. करंजीच्या डिझाईनर चमच्याने करंजीचे छान काट तयार करून घ्या.
आता करंज्या मंद आचेवर बदामी रंग येईपर्यंत तळून घ्या.
तळलेल्या करंज्या लगेच टिश्यू पेपरवर ठेवा म्हणजे अतिरिक्त तेल निघून जाईल
करंजी पूर्णपणे थंड झाल्यावर काचेच्या हवाबंद बरणीत ठेवा.