तेलकट त्वचेमुळे चिडचिड होत आहे का? 'हे' घरगुती उपाय करा, चेहरा असा उजळेल की, वारंवार सेल्फीचा मोह होईल

तुमच्या आहारात तेलकट, चमचमीत, खूप जास्त स्निग्धांश असलेले पदार्थ असतील तर तुमची त्वचा ही तेलकट होते. तेलकट त्वचा असलेल्या व्यक्ती वारंवार चेहरा धुतात मात्र, असे केल्याने आपल्या चेहऱ्याची हानी होऊ शकते. यासाठी घरगुती नैसर्गिक पद्धतीने आपल्या त्वचेवरील अतिरिक्त तेलावर नियंत्रण मिळवू शकता.
तेलकट त्वचेमुळे चिडचिड होत आहे का? 'हे' घरगुती उपाय करा, चेहरा असा उजळेल की, वारंवार सेल्फीचा मोह होईल
प्रातिनिधिक छायाचित्र - Freepik
Published on

त्वचेचे वेगवेगळे प्रकार असतात. कोणाची त्वचा कोरडी असते. तर कोणाची त्वचा तेलकट तर काही जणांची त्वचा संमिश्र असते. आपली आहारशैली, दिनचर्या, आपण त्वचेची कशा पद्धतीने काळजी घेतो तसेच अन्य काही घटकांवर आपल्या त्वचा कशी आहे, हे ठरते. तुमच्या आहारात तेलकट, चमचमीत, खूप जास्त स्निग्धांश असलेले पदार्थ असतील तर तुमची त्वचा ही तेलकट होते. तेलकट त्वचा असलेल्या व्यक्ती वारंवार चेहरा धुतात मात्र, असे केल्याने आपल्या चेहऱ्याची हानी होऊ शकते. यासाठी घरगुती नैसर्गिक पद्धतीने आपल्या त्वचेवरील अतिरिक्त तेलावर नियंत्रण मिळवू शकता. चेहरा असा उजळेल की वारंवार सेल्फी घ्यावासा वाटेल.

कोरफड

तेलकट त्वचेसाठी कोरफड अतिशय उपयुक्त आहे. यातील अँटी-इफ्लेमेट्री गुण त्वेचेला होणारे इन्फेक्शन थांबवते. कोरफडीचा गर चेहऱ्यावर चोळल्याने किंवा कोरफड जेल रात्री झोपताना चेहऱ्यावर लावल्याने त्वचा तेलकट होत नाही. तसेच तुम्ही कोरफडचा गर, हळद आणि काकडीचा रस एकत्र करून फेसपॅकही तयार करू शकता. हा पॅक १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावा नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.

मुल्तानी माती

मुलतानी माती तेलकट त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असते. चेहऱ्यावर मुलतानी माती लावल्याने तुमचा चेहरा तजेलदार होईल. मुलतानी मातीत गुलाब पाणी टाकून चेहऱ्यावर लावल्यास त्याचे जास्त चांगले फायदे मिळतात. मुलतानी माती तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करते. तसेच चेहरा मऊ देखील राहतो.

कच्चे दूध

सकाळी गार पाण्याने चेहरा धुतल्यानंतर कॉटनच्या बोळा घेऊन कच्चे दूध चेहऱ्यावर लावा. याने त्वचा खोलवर स्वच्छ होईल. तसेच रंग देखील उजळेल.

चंदन आणि हळद

चंदन आणि हळद दोघांचेही आयुर्वेदात अनेक औषधी महत्त्व सांगितले आहे. तसेच सौंदर्य समस्यांवर चंदन आणि हळद खूपच उपयुक्त आहेत. चंदन आणि हळद यामध्ये गुलाब पाणी टाकून हा पॅक चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे लावून ठेवा. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होईल. तसेच पिंपल्स, डाग देखील कमी कमी होत जातील.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in