डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी वापरून पहा ‘हे’ घरगुती उपाय!

बराच काळापर्यंत लॅपटॉपच्या स्क्रिनवर काम करणे, कामाचा ताण घेणे आणि रात्रीचे जागरण करणे, इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या सुरू होतात.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी वापरून पहा ‘हे’ घरगुती उपाय!

बराच काळापर्यंत लॅपटॉपच्या स्क्रिनवर काम करणे, कामाचा ताण घेणे आणि रात्रीचे जागरण करणे, इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या सुरू होतात. मात्र, या सोबतच त्वचेच्या ही समस्या सुरू होतात. स्क्रिनवर जास्त वेळ काम केल्याने आणि कामाचा अधिकचा ताण घेतल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात.

ही काळी वर्तुळे आल्यामुळे चेहरा निस्तेज दिसून लागतो. डोळ्यांखालील त्वचा ही अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे, ही त्वचा लवकर प्रभावित होते. आजकाल डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. मग, ही काळी वर्तुळे हटवण्यासाठी काही जण महागड्या क्रिम्सची मदत घेतात. पण , याने तात्पुरता फरक पडतो. डोळ्यांखालील ही काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

कॉफी आणि मध-

कॉफी आपल्या त्वचेसाठी अतिशय उत्तम प्रकारे काम करते. चेहऱ्यावरील फेस मास्क, फेस स्क्रब्समध्ये कॉफीचा आवर्जून वापर केला जातो. डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही कॉफीपासून आय मास्क बनवू शकता.

हा कॉफी आय मास्क बनवण्यासाठी तुम्हाला मधाची मदत घ्यावी लागेल. मधामुळे त्वचा उजळण्यास मदत होते आणि त्वचा फ्रेश दिसते. कॉफी आय मास्क बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये २-३ चमचे कॉफी पावडर घ्या. त्यामध्ये १-२ चमचे मध मिसळा.

याची चांगल्या प्रकारे पेस्ट तयार करा आणि डोळ्यांखाली ही पेस्ट लावा. त्यानंतर १५-२० मिनिटे ही पेस्ट तशीच ठेवा. त्यानंतर, चेहरा धुवून टाका.

काकडी आणि गुलाबजल-

काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे, शरीर आणि त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी काकडी अतिशय फायदेशीर आहे. चेहऱ्यावर काकडीचा वापर केल्याने चेहरा हायड्रेटेड राहण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर छान चमक येते. काकडीसोबतच गुलाबजल देखील त्वचेसाठी फायदेशीर आहे. गुलाबजलचा वापर केल्याने कोरड्या त्वचेपासून आराम मिळतो.

काकडी आणि गुलाबजलचा हा आय मास्क बनवण्यासाठी १ काकडी धुवून घ्या. त्यानंतर, ती किसून घ्या. आता या किसलेल्या काकडीची बारीक पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये ३-४ थेंब गुलाबजल मिसळा. त्यानंतर, ही पेस्ट डोळ्यांखाली लावा आणि १५-२० मिनिटांनी चेहरा धुवा.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in