सातत्याने बसून काम करत आहात? ॲसिड रिफ्लेक्ससह पचनविकाराच्या समस्या होऊ शकतात; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

सातत्याने एकाच ठिकाणी बसून काम केल्याने आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. आपण कार्यालयात सामान्यपणे आठ तास एकाच जागेवर काम करत असाल तर या बैठ्या जीवनशैलीमुळे तुम्हाला ॲसिड रिफ्लेक्ससह (acid reflux) पचनविकारासंबंधी वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात.
सातत्याने बसून काम करत आहात? ॲसिड रिफ्लेक्ससह पचनविकाराच्या समस्या होऊ शकतात; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
Freepik
Published on

सातत्याने एकाच ठिकाणी बसून काम केल्याने आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. आपण कार्यालयात सामान्यपणे आठ तास एकाच जागेवर काम करत असाल तर या बैठ्या जीवनशैलीमुळे तुम्हाला ॲसिड रिफ्लेक्ससह (acid reflux) पचनविकारासंबंधी वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामध्ये ओटीपोटात दुखणे, पोडात मुरड येणे, अतिसार अशा आजारांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घ्या अॅसिड रिफ्लेक्स म्हणजे नेमके काय? यामुळे कोणकोणते आजार संभवतात.

ॲसिड रिफ्लेक्स (acid reflux) म्हणजे नेमकं काय?

काही खाल्ल्यानंतर तुम्हाला छातीत जळजळ होत असेल तर समजून घ्या ही ॲसिड रिफ्लेक्सची समस्या आहे. यापाठीमागे अन्ननलिका आणि जठर यांना जोडणारी वर्तुळाकार झडपचे कार्य बिघडणे हे कारण असते. अन्न खाल्ल्यानंतर ते अन्ननलिकेतून जठराकडे जाते. ज्याठिकाणी अन्ननलिका आणि जठर जोडलेले असतात त्याठिकाणी एक वर्तुळाकार झडप असते. अन्ननलिकेतून जठराकडे अन्न पोहोचते तेव्हा ही झडप बंद होते. मात्र, ही झडप कधी कधी सैल पडते. अशावेळी जठरातील आम्ल अन्ननलिकेत जाते आणि छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. यालाच ॲसिड रिफ्लेक्स, असे म्हणतात.

काय आहेत ॲसिड रिफ्लेक्सची लक्षणे?

जेव्हा तुम्हाला छातीत जळजळते, घसा खवखवत असेल किंवा ओटीपोटात दुखत असेल तर ती ॲसिड रिफ्लेक्सची लक्षणे असू शकतात. याला हार्ट बर्न असेही म्हणतात.

ॲसिड रिफ्लेक्सची कारणे काय?

तुमची जीवनशैली ही यामागचे एक प्रमुख कारण असू शकते. सातत्याने बैठे काम केल्याने किंवा एकाच ठिकाणी बसून राहिल्याने अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

...तर दुर्लक्ष करू नका

क्वचित प्रसंगी असे होत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, जर हा त्रास तुम्हाला सातत्याने होत असेल तर तुम्हाला सावधान व्हावे लागेल. कारण ही समस्या सातत्याने होत असेल तर त्याचे रुपांतार गैस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स रोग (GERD) मध्ये होऊ शकते. मात्र, योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याने या समस्येवर चांगले उपचार होऊ शकतात. याशिवाय अतिसार किंवा जुलाब होण्यासारखे आजार देखील यामुळे संभवतात. त्यामुळे वारंवार अॅसिड रिफ्लेक्स होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार घ्या. तसेच जीवनशैलीत हे छोटे बदल केल्याने देखील या समस्या टाळल्या जाऊ शकतात.

  • सातत्याने बसून काम करू नका.

  • अधुनमधून छोटे-छोटे ब्रेक घ्या. या ब्रेकमध्ये किमान ५-६ मिनिटे चाला.

  • पौष्टिक आहार घ्या.

  • वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in