Diabetes Care: कडक उन्‍हाळ्यात मधुमहाच्या रुग्णांनी 'अशी' घ्या काळजी, फॉलो करा 'या' टिप्‍स!

Summer Health Care: सध्या प्रचंड उकाडा आहे. या गरम वातावरणात मधुमेह असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आजाराचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
Diabetes Care: कडक उन्‍हाळ्यात मधुमहाच्या रुग्णांनी 'अशी' घ्या काळजी, फॉलो करा 'या' टिप्‍स!

Health Care: तापमान वाढत आहे आणि उन्‍हाळ्यातील उकाडा असह्य होत आहे. भारतीय हवामानशास्‍त्र विभागाच्‍या (आयएमडी) नोंदणीनुसार एप्रिलमध्‍ये भारतात कडाक्‍याचा उन्‍हाळा जाणवला, तसेच अनेक लहान व मोठ्या भागांमध्‍ये उष्‍णतेची तीव्र लाट दिसून आली. दुर्दैवाने, वर्ष २०२४ अधिक उष्‍ण असण्‍याची आणि गेल्‍या वर्षातील तापमानाचा विक्रम मोडून काढण्‍याची शक्‍यता वाटते. हा ट्रेण्‍ड फक्‍त स्‍थानिक पातळीवर नाही तर जगभरात दिसून येत आहे. २०२३ आतापर्यंतचे सर्वाधिक उष्‍ण वर्ष ठरले आहे. म्‍हणून, तापमान वाढत असताना थंड व सुरक्षित राहणे अधिक महत्त्वाचे बनले आहे.

उन्‍हाळ्यातील वाढते तापमान आणि उष्‍णतेच्‍या लाटांसह मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी आव्‍हाने निर्माण होतात. उष्‍ण वातावरणामुळे व्‍यक्‍तीच्‍या शरीरातील पाणी व मीठाचे प्रमाण कमी होते, परिणामत: डिहायड्रेशन आणि उष्‍णतेमुळे थकवा येतो. उष्‍णतेमुळे येणाऱ्या थकव्‍यासह रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे व्‍यवस्‍थापन करणे आव्‍हानात्‍मक ठरते, ज्‍यामुळे मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍ती उच्‍च तापमान व आर्द्रतेप्रती अधिक संवेदनशील आहेत. म्‍हणून, काळजी घेणे महत्त्वाचे आहे. उष्‍णतेच्‍या लाटांमुळे दैनंदिन नित्‍यक्रमांमध्‍ये व्‍यत्‍यय येऊ शकतो आणि मधुमेह व्‍यवस्‍थापनावर परिणाम होऊ शकतो.

मुंबईतील डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल पवईचे मेटबोलिक फिजिशियन डॉ. विमल पहुजा म्‍हणाले, ''मधुमेहाचे व्यवस्‍थापन करण्‍यासाठी आरोग्‍यदायी नित्‍यक्रम राखणे आवश्‍यक आहे, पण उन्‍हाळ्यादरम्‍यान अनेकदा त्‍यामध्‍ये व्‍यत्‍यय येतात. दैनंदिन सवयींमध्‍ये बदल केल्‍यास मधुमेह-अनुकूल आहाराचे पालन करण्‍यामध्‍ये किंवा वेळेवर रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांची तपासणी करण्‍यामध्‍ये चूक होऊ शकते. तसेच, कडक उकाड्यादरम्‍यान मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींना विशेषत: त्‍यांच्‍या रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्या अनियंत्रित राहिल्‍यास डिहायड्रेशनचा उच्‍च धोका असतो. रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे प्रभावीपणे संतुलन राखण्‍यासाठी कन्टिन्‍युअल ग्‍लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) सारख्‍या उपाययोजनांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. स्‍मार्टफोनशी सुसंगत असलेले सीजीएम डिवाईस चालता-फिरता रिअल-टाइम मॉनिटरिंग देते, मधुमेह व्‍यवस्‍थापनाबाबत तडजोड न करता नित्‍यक्रमामधील बदलांना प्रतिबंध करते.''

मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींनी उन्‍हाळ्यादरम्‍यान दिवसभरातील अधिक काळापर्यंत शिफारस केलेल्‍या लक्ष्‍य रेंजमध्‍ये (७० ते १८० mg/dl ) रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्या राखणे महत्त्वाचे आहे. कन्टिन्‍युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) डिवाईसचा वापर करत हे साध्‍य करता येते. सीजीएम डिवाईस बोटाला टोचण्‍याची गरज न लागता रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांबाबत माहिती देतात. अशा डिवाईसमध्‍ये टाइम इन रेंज सारखे मेट्रिक्‍स असतात आणि रीडिंग्‍ज तपासण्‍यामधून सानुकूल रेंजमध्‍ये अधिक वेळ व्‍यतित होण्‍याची खात्री मिळते, ज्‍यामुळे रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवरील नियंत्रण सुधारू शकते.

उष्‍णतेच्‍या लाटांवर मात करत मधुमेहावर देखरेख ठेवण्‍यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या ४ सोप्‍या पायऱ्या:

> हायड्रेशन सर्वाधिक महत्त्वाचे: उष्‍णतेच्‍या लाटांदरम्‍यान डिहायड्रेशनला प्रतिबंध करण्‍यासाठी तहान लागलेली नसताना देखील भरपूर प्रमाणात पाणी पित हायड्रेटेड राहण्‍याची खात्री घ्‍या. योग्‍य हायड्रेशनमुळे रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे निय‍मन करण्‍यामध्‍ये मदत होण्‍यासोबत रक्‍तप्रवाहामधील टॉक्झिन्‍स उत्‍सर्जित देखील होतात. मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींना विशेषत: उष्‍ण तापमानादरम्‍यान शरीरातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होण्‍याच्‍या शक्‍यतेमुळे डिहायड्रेशनचा उच्‍च धोका असतो. अपुऱ्या प्रमाणात पाणी पिल्‍याने रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्या वाढतात, रक्‍तातील शर्करेच्‍या उच्‍च पातळ्यांमुळे सतत लघवीला होते, परिणामत: डिहायड्रेशन होते. व्‍यक्‍तीने किती पाणी प्‍यावे हे वजन, वय, शारीरिक व्‍यायाम अशा घटकांवर अवलंबून असले तरी सरासरी व्‍यक्‍तीने दिवसाला किमान २ लीटर पाणी प्‍यावे.

> नियमितपणे रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर देखरेख ठेवा: उष्‍णतेच्‍या लाटेदरम्‍यान रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर सतत देखरेख ठेवणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. फ्रीस्‍टाइल सारखे प्रगत सेन्‍सर-आधारित कन्टिन्‍युअल मॉनिटरिंग डिवाईसेस तुम्‍हाला व्‍यायाम करत असताना किंवा झोपलेले असताना अहोरात्र रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर देखरेख ठेवण्‍यास मदत करतात. हे डिवाईसेस रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर बारकाईने लक्ष ठेवतात आणि त्‍यामध्‍ये चढ-उतार झाल्‍यास अचूक, रिअल-टाइम अलर्टस् देतात. ज्‍यामुळे तुम्‍हाला रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांमध्‍ये अचानक होणाऱ्या चढ-उताराबाबत चिंता करण्‍याची गरज भासत नाही. रिडिंग्‍जवर लक्ष ठेवा आणि दिवसातील २४ तासांपैकी जवळपास १७ तासांपर्यंत रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्या ऑप्टिमल रेंजपर्यंत ठेवण्‍याचा प्रयत्‍न करा.

> स्मार्टपणे व्‍यायामाचे नियोजन करा: मधुमेह केअरमधील आवश्‍यक घटक सक्रिय जीवनशैली आहे, पण उष्‍माघात व डिहायड्रेशनपासून स्‍वत:चे संरक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे. तापमान उष्‍ण असताना घराबाहेर पडू नका आणि त्‍याऐवजी इनडोअर व्‍यायाम किंवा योगाचा अवलंब करा. सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा बाहेर जाऊन व्‍यायाम करता येऊ शकतो, पण उष्‍ण तापमानादरम्‍यान इनडोअर जिममध्‍ये जाणे किंवा घरामध्‍येच व्‍यायाम करणे उत्तम आहे.

> आरोग्‍यदायी आहाराचे सेवन: उन्‍हाळ्यादरम्‍यान आइस्‍क्रीम व स्‍लशीजचा आस्‍वाद घेणे स्‍वाभाविक आहे. पण, मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींनी अधिक सावधगिरी राखण्‍याची आणि त्‍यांच्‍या स्थितीला अनुकूल संतुलित व आरोग्‍यदायी आहाराचे सेवन करण्‍याची खात्री घेतली पाहिजे. सेलेरी व ब्रसेल स्‍प्राऊट्स सारख्‍या उच्‍च फायबर असलेल्‍या भाज्‍या व पालेभाज्‍यांचा आहारामध्‍ये समावेश केल्‍यास रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे नियमन करण्‍यास मदत होऊ शकते. तसेच, रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी दैनंदिन आहारामध्‍ये संत्री, लिंबू व आवळा यांसारख्‍या लिंबूवर्गीय फळांचा समावेश करता येऊ शकतो, ज्‍यामध्‍ये व्हिटॅमिन सी संपन्‍न प्रमाणात असते.

उन्‍हाळा हा विश्रांती करण्‍याचा आणि काळजीमुक्‍त राहत धमाल करण्‍याचा काळ आहे. पण, मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी उन्‍हाळ्याचा आनंद घेणे आव्‍हानात्‍मक ठरू शकते. या जीवनशैली आजाराचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी लहान व आटोपशीर पावले उचलून तुम्‍ही आरोग्‍यावर नियंत्रण ठेवू शकता, उत्‍साहाने जीवन जगू शकता आणि ऋतूचा आनंद घेऊ शकता.

logo
marathi.freepressjournal.in