Home
मुंबई
नवी मुंबई
ठाणे
महाराष्ट्र
राष्ट्रीय
क्रीडा
मनोरंजन
संपादकीय
लाइफस्टाइल
आंतरराष्ट्रीय
अक्षररंग
लाईफस्टाईल
नारळात पाणी जास्त आहे की कमी, कसं ओळखायचं?
नारळ पाणी प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे होतात.
Suraj Sakunde
Published on:
13 Jun 2024, 3:32 pm
Copied
नारळ पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियमसारखी अनेक इलेक्ट्रोलाईट्स, विटामिन्स, अँटीऑक्सिडंट इत्यादी तत्त्व विपुल प्रमाणात असतात.
FPJ
गरमीच्या दिवसात नारळ पाणी पिणे फायदेशीर आहे. त्याचे शरीराला अनेक फायदे होतात.
FPJ
मार्केटमधून नारळ खरेदी करताना त्यात जास्त पाणी असावं, असं आपल्याला वाटत असतं.
FPJ
परंतु बऱ्यातदा आपल्याला जास्त पाणी असलेलं नारळ मिळत नाही. आज आपण नारळात पाणी कमी आहे की जास्त, हे कसं चेक करायचं हे पाहणार आहोत.
FPJ
जे नारळ ताजे आणि हिरव्या रंगाचे असतात, त्यांच्यात पाणी जास्त असतं. मात्र करड्या रंगाच्या नारळात पाणी कमी प्रमाणात आढळतं.
FPJ
लोक बहुतेक वेळा मोठ्या आकाराचा नारळ खरेदी करतात. मात्र त्यामध्ये जास्त पाणी असेलच असं नाही.
FPJ
मोठ्या आकाराच्या नारळात पाण्याच्या तुलनेत मलई जास्त असते. जर तुम्हाला अधिक पाणी असलेला नारळ हवा असेल, तर मध्यम आकाराचा नारळ खरेदी करा.
FPJ
ज्या नारळात पाणी जास्त असतं, त्याचा आवाज येत नाहीत. ज्या नारळातून पाण्याचा आवाज येतो, त्यात पाणी कमी असण्याची शक्यता असते.
FPJ
coconut water
health tips
diet tips
marathi.freepressjournal.in
INSTALL APP