Summer Season AC Maintenance Tips: सध्या राज्यात कडक उन्हाळ्याचा सामना करावा लागत आहे. तापमान सहज ३०-३५ च्या वर जात आहे. गरम वातावरणामुळे सगळेच बेहाल झाले आहेत. अशावेळी या गर्मी पासून वाचण्यासाठी अनेकजण घरात एसी-कूलर लावत आहेत. परंतु अनेक वेळा असे घडते की जुना एसी खोलीला थंड करू शकत नाही. काही ठिकाणी कुलिंग होण्यासाठी तासनतास वेळ लागतो. खरतर एसी थंड न होण्यामागे खूप छोटी कारणं आहेत. ही कारणं जर तुम्हाला माहित झाली तर तुम्ही या समस्या स्वतःच दूर करू शकता. जर तुमचा एसी कूलिंग देत नसेल तर ही समस्या कशी दूर करावी हे जाणून घ्या.
कंडेन्सर साफ करा
एसीचे दोन भाग असतात, त्यातील एक भाग घराच्या आत लावला जातो आणि दुसरा बाहेर. हा दुसरा मोठा भाग म्हणजे कंडेन्सर. कंडेन्सरमुळे घरातील गरम हवा बाहेर येते. हा भाग घराच्या बाहेर असल्याने त्यावर भरपूर धूळ आणि घाण साचते. यामुळे कंडेन्सर कॉइल गरम हवा योग्य प्रकारे खोलीतून बाहेर फेकत नाही आणि खोली लवकर थंड होत नाही. अशावेळी कंडेन्सर कॉइलमधून धूळ साफ करणे गरजेचे आहे. पाण्याच्या स्प्रेने तुम्ही कंडेन्सर साफ करू शकता.
रिमोटही असू शकतो खराब
बरेचदा असे होते की एसीचे सर्व काही ठीक असते परंतु तरीही एसी नीट काम करत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही एसीचा रिमोटही एकदा तपासून पहा. अनेक वेळा रिमोटचे बटण नीट काम करत नसल्याने तापमान बदलत नसेल.
एसी फिल्टरमधील घाण साफ करणे गरजेचे
एसी फिल्टरमध्ये घाण साचली असेल तर त्यामुळे एसीची कूलिंगही कमी होते. एसी फिल्टरमध्ये साचलेल्या घाणीमुळे हवेचा प्रवाह कमी होतो. म्हणूनच एसी फिल्टर तपासा. त्यात धूळ साचली असेल तर लगेच स्वच्छ करा. साफसफाई करून एसी चालू केल्यास थंड हवा येऊ लागेल.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)