How to Keep Eyes Safe: कधी पाऊस ईतर कधी कडक उन्हाळा.. सध्या वातावरण बदलेले आहे. या वातावरणात आपण बाकीची काळजी घेतो मात्र डोळ्यांची काळजी घेणे मात्र विसरतो. उष्णतेची लाट असताना आपल्या डोळ्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे ठरते. तीव्र उष्णता आणि आर्द्रतेचा आपल्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. योग्य ती खबरदारी न घेतल्यास गंभीर आजार होऊ शकतात. उष्णतेच्या लाटेदरम्यान आपल्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी डॉ. अगरवाल आय हॉस्पिटल, मुलुंड पश्चिमचे हेड क्लिनिकल- सर्व्हिसेस डॉ. हरिश बाबू राय यांनी आवश्यक टिप्स दिल्या आहेत.
या टिप्स फॉलो करा
थेट सूर्यप्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण
उष्णतेच्या लाटेदरम्यान हानिकारक अतिनील किरणांमुळे डोळ्यांचे नुकसान होऊ शकते. ज्यामुळे फोटोकेरेटायटीस किंवा मोतीबिंदूसारख्या दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात. घराबाहेर असताना सनग्लास घाला , डोळे झाकले जातील अशा टोप्या घातल्याने डोळ्यांचा हानिकारक अतिनील किरणांशी होणारा संपर्क लक्षणीयरित्या कमी करू होईल.
शरीरातील पाण्याची पातळी राखणे
निर्जलीकरण/ शरीरातील पाणी कमी झाल्याने डोळे कोरडे पडू शकतात. ज्यामुळे अस्वस्थता आणि जळजळ होऊ शकते. ज्यामुळे आपले शरीर आणि डोळे पुरेसे हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
स्क्रीन पाहताना नियमित विश्रांती घेणे
कोणताही स्क्रीन पाहताना, काम करताना अधून-मधून विश्रांती घेतल्याने डोळ्यांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. विशेषतः उष्णतेच्या लाटेदरम्यान जेव्हा उष्म्याने डोळ्यांचा थकवा वाढू शकतो; दीर्घकाळ स्क्रीन पहिल्याने डोळ्यांवर डिजिटल ताण येऊ शकतो, ज्यामध्ये कोरडे डोळे, अस्पष्ट दृष्टी आणि डोकेदुखी यासारखी लक्षणे दिसून येतात. त्याकरिता २०-२०-२० नियमाचे पालन करणे महत्वाचे आहेः दर २० मिनिटांनी, २० सेकंदांचा ब्रेक घ्या आणि डोळ्यांना आराम मिळावा म्हणून २० फूट दूर काहीतरी पहा.
घरात हवेची गुणवत्ता राखणे
उष्णतेच्या लाटेदरम्यान डोळ्यांची जळजळ रोखणे आवश्यक आहे. उच्च तापमान आणि आर्द्रतेची पातळी घरातील वायू प्रदूषण वाढवू शकते. ज्यामुळे धूळ, परागकण आणि प्रदूषक अशा घटकांना चालना मिळते. ज्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. एअर प्युरिफायरचा वापर करणे आणि घरातील जागा चांगल्याप्रकारे हवेशीर ठेवल्याने घरातील वायू प्रदूषकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. ज्यामुळे आपल्या डोळ्यांचे संरक्षण होते.
डोळ्यांच्या नियमित तपासणीला प्राधान्य देणे
डोळ्यांची नियमित तपासणी करणे महत्वाचे आहे. विशेषतः उष्णतेच्या लाटेदरम्यान जेव्हा डोळ्यांशी संबंधित समस्यांचा धोका अधिक असतो. डोळ्यांच्या सर्वसमावेशक तपासणीसाठी एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरला भेट दिल्याने डोळ्यांची कोणतीही अंतर्निहित स्थिती लवकर शोधण्यात आणि ती बिघडण्यापासून रोखण्यात मदत होऊ शकते.