Gut Health: आतड्यांचे आरोग्य कसे राखायचे? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Health Care: मानवी आतड्यांमध्‍ये कोट्यवधी जीवाणू, कवक व विषाणू असतात, जे एकत्रितपणे आतड्यातील मायक्रोबायोम म्‍हणून ओळखले जातात. हे सूक्ष्‍मजंतू पचनास साह्य करत, चयापचय क्रियेचे नियमन करत आणि रोगप्रतिकारशक्‍ती वाढवत एकूण आरोग्‍य उत्तम राखण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
Gut Health: आतड्यांचे आरोग्य कसे राखायचे? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Microbiome: मानवी आतड्यांमध्‍ये कोट्यवधी जीवाणू, कवक व विषाणू असतात, जे एकत्रितपणे आतड्यातील मायक्रोबायोम म्‍हणून ओळखले जातात. हे सूक्ष्‍मजंतू पचनास साह्य करत, चयापचय क्रियेचे नियमन करत आणि रोगप्रतिकारशक्‍ती वाढवत एकूण आरोग्‍य उत्तम राखण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात. पण, तणाव, अ‍ॅण्‍टीबायोटिक्‍स व अनारोग्‍यकारक आहार यांसारखे विविध घटक आतड्यातील मायक्रोबायोमच्‍या संतुलनामध्‍ये अडथळा आणू शकतात, ज्‍यामुळे अनेक आरोग्‍यविषयक आजार उद्भवू शकतात. आतड्यातील मायक्रोबायोममध्‍ये आलेल्‍या अडथळ्याचे व्‍यवस्‍थापन आणि एकूण आरोग्‍यामध्‍ये सुधारणा कशी करावी याबाबत काही टिप्‍स खाली देण्‍यात आल्‍या आहेत. वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलमधील गॅस्‍ट्रोएण्‍टेरोलॉजीचे संचालक सतिश कुलकर्णी यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊयात...

आरोग्‍यदायी आहाराचे सेवन करा

आतड्यातील मायक्रोबायोममध्‍ये आलेल्‍या अडथळ्याचे व्यवस्‍थापन करण्‍यामधील सर्वात महत्त्वाचे पाऊल म्‍हणजे आरोग्‍यदायी आहाराचे सेवन करणे. याचा अर्थ असा की भरपूर प्रमाणात फळे, भाज्‍या, संपूर्ण धान्‍य आणि लीन प्रोटीन स्रोतांचे सेवन करण्‍यासोबत प्रक्रिया केलेले अन्‍न, साखरयुक्‍त पेये आणि सॅच्‍युरेटेड फॅट्स टाळावे. हे फूड्स आतड्यांमधील सूक्ष्‍मजंतूंची वाढ होण्‍यासाठी आवश्‍यक पौष्टिक घटक देतात, तसेच एकूण आरोग्‍य उत्तम राखण्‍यास मदत देखील करतात.

प्रोबायोटिक्‍स घ्‍या

प्रोबायोटिक्‍स हे गुणकारी जीवाणू आहेत, जे आतड्यातील मायक्रोबायोमचे संतुलन उत्तम राखण्‍यास मदत करू शकतात. केफिर, सॉकरक्रॉट व दही यांसारखे आंबवलेले पदार्थ प्रोबायोटिक्‍सचे उत्तम स्रोत आहेत किंवा पूरक आहारातून मिळू शकतात. संशोधनामधून निदर्शनास आले आहे की, प्रोबायोटिक्‍स पाचक आरोग्‍य सुधारू शकतात, रोगप्रतिकारशक्‍ती वाढवू शकतात आणि चिंता व नैराश्‍य अशा मानसिक आरोग्‍य समस्‍यांचे निराकरण करण्‍यास देखील मदत करू शकतात.

अ‍ॅण्‍टीबायोटिकचा मर्यादित वापर

अ‍ॅण्‍टीबायोटिक्स जीवनदायी औषधे असू शकतात, पण घातक व लाभदायी जीवाणूंना नष्‍ट करत आतड्यातील मायक्रोबायोममध्‍ये अडथळा देखील आणू शकतात. तुम्‍हाला अ‍ॅण्‍टीबायोटिक्‍स घेणे गरजेचे असेल तर डॉक्‍टरांच्‍या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करा आणि आतड्यातील मायक्रोबायोमचे संतुलन राखण्‍यासाठी प्रोबायोटिक सप्‍लीमेंट घेण्‍याचा विचार करा.

तणाव कमी करा

तणावामुळे पचन व रोगप्रतिकारशक्‍तीचे नियमन करणारे हार्मोन्‍स व न्‍यूरोट्रान्‍समिटर्सच्‍या संतुलनामध्‍ये बदल होत आतड्यातील मायक्रोबायोममध्‍ये अडथळा येऊ शकतो. तणाव दूर करण्‍यासाठी चिंतन, योगा किंवा दीर्घ श्‍वास घेणे असे आराम देणाऱ्या तंत्रांचे पालन करा. तणाव कमी करण्‍यासाठी आणि एकूण आरोग्‍य सुधारण्‍यासाठी व्‍यायाम देखील प्रभावी मार्ग आहे.

पुरेशी झोप घ्‍या

आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी झोप आवश्‍यक आहे आणि झोप आतड्यातील मायक्रोबायोमचे नियमन करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते. संशोधनामधून निदर्शनास आले आहे की, पुरेशी झोप मिळाली नाही तर आतड्यातील सूक्ष्‍मजंतूंच्‍या संतुलनामध्‍ये अडथळा येऊ शकतो, ज्‍यामुळे जळजळ आणि इतर आरोग्‍यविषयक आजार उद्भवू शकतात. दररोज किमान सात तास झोप घेण्‍याचा आणि नियमितपणे झोपेच्‍या वेळापत्रकाचे पालन करण्‍याचा प्रयत्‍न करा.

थोडक्‍यात, आतड्यातील मायक्रोबायोम एकूण आरोग्‍य उत्तम राखण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि या महत्त्वपूर्ण संतुलनामधील व्‍यत्‍ययांमुळे अनेक आरोग्‍यविषयक आजार होऊ शकतात. आरोग्‍यदायी आहाराचे सेवन करत, प्रोबायोटिक्‍स घेत, अॅण्‍टीबायोटिकचा मर्यादित वापर, तणाव कमी करत आणि पुरेशी झोप घेत तुम्‍ही आतड्यातील मायक्रोबायोममध्‍ये आलेल्‍या अडथळ्यांचे व्‍यवस्‍थापन करू शकतात आणि एकूण आरोग्‍य सुधारू शकता. लक्षात ठेवा, लहान बदलांमुळे मोठा फरक घडून येऊ शकतो, म्‍हणून एकावेळी एक बदल करत सुरूवात करा आणि संयम राखा - आतड्यातील मायक्रोबायोमचे नैसर्गिक संतुलन पुन्‍हा सुरळीत होण्‍यास वेळ लागतो.

logo
marathi.freepressjournal.in