Aam Papad Recipe: ही सोपी रेसिपी वापरून घरच्या घरी बनवा आंबा पोळी, वर्षभर मिळेल आंब्याचा आनंद!

Summer Recipe: आंब्यांचा सीजन सुरु झाला आहे. पुन्हा बाकीचे महिने आंबा मिळत नाही. अशावेळी जर तुम्हाला वर्षभर आंब्याचा आनंद घ्यायचा असेल तर आंबा पोळी आवर्जून बनवली पाहिजे.
Amazon
Amazon

How to Make Amba Poli: आंबा म्हणजे फळांचा राजा. आंबा खाण्यासाठी आवर्जून वर्षभर उन्हाळ्याची वाट बघितली जाते. सीजन सुरु होताच सगळेच यावर ताव मारतात. हे फळ चविष्ट तर आहेच पण याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, बी६, बी१२, सी, के, फायबर आणि फॉलिक ॲसिड सारखे अनेक पोषक घटक देखील आहेत. हे सर्व घटक शरीर निरोगी ठेवण्यासाठी फार आवश्यक असतात. आंबा फळ म्हणून तर असाच खाल्ला जातो पण याशिवाय आंब्याचा शेक, ज्यूस, पन्ह असे अनेक प्रकार बनवले जातात. या पदार्थांच्या यादीत आणखी एक पदार्थ आहे तो म्हणजे आंब्याचा पापड किंवा आंब्याची पोळी. हा सोपा पदार्थ बनवून तुम्ही वर्षातून काहीच काळ मिळणाऱ्या या फळाचा वर्षभर आस्वाद घेऊ शकता. आंबा पोळी ही एक उत्तम मिठाई आहे. तुम्ही दुपारचं किंवा रात्रीचं जेवण झाल्यावर या मिठाईचा आस्वाद घेऊ शकता. लक्षात घ्या की बाकीच्या मिठाईपेक्षा आंब्याची पोळी हा आरोग्यदायी पर्याय आहे. आंबा पोळी घरी सहज बनवता येईल. चला आंब्याची पोळी बनवायची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.

लागणारे साहित्य

 • आंब्याचा पल्प - एक कप

 • साखर - ३ टेबलस्पून

 • मीठ - चिमूटभर

 • लिंबाचा रस - ३ ते ४ थेंब

 • पाणी - १/४ कप

जाणून घ्या कृती

 • सर्वप्रथम आंबे छान धुवून घ्या आणि साधारण १ तास पाण्यात भिजत ठेवा.

 • यानंतर, त्याची साल काढून घेऊन आंब्याचे तुकडे करा.

 • नंतर मिक्सरमध्ये हे तुकडे बारीक वाटून घ्या.

 • आता कढईत अर्धा कप पाणी गरम करण्यासाठी ठेवा.

 • या पाण्यात बनवलेली आंब्याची पेस्ट घाला आणि मंद आचेवर छान शिजवून घ्या. साधारणपणे १० मिनिटे शिजवा.

 • त्यानंतर या मिश्रणात साखर, मीठ आणि लिंबाचा रस घाला.

 • सतत ढवळत असताना आणखी १० मिनिटे शिजवा.

 • त्याचं टेक्शर घट्ट होऊ लागलं की गॅस बंद करा.

 • एका ताटाला तूप लावा. हे मिश्रण त्या ताटामध्ये पसरवा.

 • हवेचे बबल काढण्यासाठी ताटाला हलकेच टॅप करा.

 • नंतर ताट कापडाने झाकून उन्हात वाळवा.

 • पूर्ण सुकल्यावर त्याचे पातळ काप करा.

 • ही पोळी वर्षभर टिकवण्यासाठी हवाबंद डब्यात स्टोअर करा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in