Beetroot Rice Recipe: जेवणासाठी बनवा लोह आणि फायबरने समृद्ध 'बीटरूट राइस'; नोट करा रेसिपी

Healthy Easy Recipe: . बीटरूटचा समावेश सुपरफूडच्या श्रेणीत होते. त्यात लोह, कॅल्शियम, फायबर, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, बी ९, सी, फोलेट आणि इतर अनेक पोषक घटक देखील असतात.
Beetroot Rice Recipe: जेवणासाठी बनवा लोह आणि फायबरने समृद्ध 'बीटरूट राइस'; नोट करा रेसिपी
illusions4ever/ Youtube
Published on

How to Make Beetroot Rice :आहारात हिरव्या भाज्या आणि सॅलडचा अनेक प्रकारे समावेश करू शकता. त्याचा उत्तम पर्याय म्हणजे बीटरूट भात. बीटरूटचा समावेश सुपरफूडच्या श्रेणीत होते. त्यात लोह, कॅल्शियम, फायबर, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, बी ९, सी, फोलेट आणि इतर अनेक पोषक घटक देखील असतात. आहारात याचा समावेश करून अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. आज आपण याचीतून एक रेसिपी तयार करणार आहोत, जी सगळ्यांना आवडते.

लागणारे साहित्य

तांदूळ- १ कप, बीटरूट- २५० ग्रॅम, वाटाणे- १०० ग्रॅम, कांदा- १ चिरलेला, टोमॅटो- १, लसूण पेस्ट- १/२ टीस्पून, आले पेस्ट- १/२ टीस्पून, कोथिंबीर- २ टीस्पून, दही- १/२ कप, पुदिना - २ टीस्पून, काजू - ८-१०, तमालपत्र - १, हिरवी वेलची - २, दालचिनी - १/२इंच, धने पावडर - १ टीस्पून, लाल मिरची - १/२ टीस्पून, जिरे पावडर - १/२ टीस्पून , हळद- १/४ टीस्पून, गरम मसाला- १/२ टीस्पून, मीठ- चवीनुसार

जाणून घ्या कृती

  • तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने चांगले धुतल्यानंतर किमान अर्धा तास स्वच्छ पाण्यात भिजत ठेवा.

  • कढईत किंवा कुकरमध्ये तूप किंवा तेल घाला. तूप चांगले तापले की त्यात तमालपत्र, वेलची, दालचिनी घालून थोडा वेळ परतून घ्या. नंतर काजू घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.

  • त्यानंतर चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता.

  • कांद्यानंतर आले-लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत शिजवा.

  • नंतर चिरलेला टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत तळा.

  • टोमॅटो शिजले की गॅस कमी करून त्यात दही घाला.

  • आता त्यात धने पावडर, हळद, तिखट आणि थोडा गरम मसाला घालून सर्वकाही मिक्स करा.

  • त्यानंतर त्यात मटार आणि बीटरूटचे तुकडे घाला. दोन्ही झाकण ठेवून थोडा वेळ शिजवा. दोन कप पाणी आणि मीठ घाला.

  • बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर आणि पुदिना घाला.

  • नंतर त्यात भिजवलेले तांदूळ घालून कुकरचे झाकण ठेवून एक शिटी होईपर्यंत शिजवा.

  • बीटरूट भात तयार आहे.

logo
marathi.freepressjournal.in