Besan Poha Cutlet
Freepik

Besan Poha Cutlet Recipe: नाश्ता बनवा बेसन पोहे कटलेट, जाणून घ्या सोपी रेसिपी!

Breakfast Recipe: सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळच्या चहासोबतही तुम्ही बेसन पोहे कटलेटचा आस्वाद घेऊ शकता.

Healthy Breakfast: रोज एकसारखा नाश्ता केल्याने कंटाळा येऊ शकतो. सकाळच्या नाश्त्याला काही तरी नवीन हवं असते. पण सकाळच्या वेळी टेस्टी आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी हवंय असतात. यासाठी बेसन पोहे कटलेट तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. या चवदार आणि खुसखुशीत कटलेटचा सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळच्या चहासोबत (Tea Time Snacks) तुम्ही त्याची चव चाखू शकता. जर तुम्हाला पोहे आणि पकोडे दोन्ही आवडत असतील तर तुम्हाला बेसन पोहे कटलेटमध्ये दोन्हीचे कॉम्बिनेशन मिळेल. चला जाणून घेऊयात ही रेसिपी बनवण्याची सोपी पद्धत.

लागणारे साहित्य

  • पोहे - ४ वाट्या

  • बेसन - १ वाटी

  • रवा - १ कप

  • चिरलेला कांदा - २

  • बारीक चिरलेली मिरची – ३

  • कोथिंबीर पाने - १ कप

  • मिरची पावडर - १ टीस्पून

  • हळद - १ टीस्पून

  • जिरे पावडर - १ टीस्पून

  • चाट मसाला- १ टीस्पून

  • तेल - (आवश्यकतेनुसार)

  • मीठ - चवीनुसार

जाणून घ्या कृती

  • प्रथम पोहे ५ ते ७ मिनिटे पाण्यात भिजवा. तोपर्यंत बेसन कोरडे भाजून घेऊ.

  • आता त्यात रवा, हिरवी मिरची, जिरेपूड, हळद, मिरची पावडर, कोथिंबीर आणि मीठ घाला.

  • भाजलेले बेसन थंड झाल्यावर ते पोह्यात घालून चांगले मळून घ्या.

  • यानंतर तळहातावर थोडे तेल लावून पोह्यांच्या मिश्रणाला हवा तो आकार द्या.

  • कढईत तेल गरम करून पोहे कटलेट मंद आचेवर तळून घ्या. लक्षात ठेवा कटलेट्स फक्त मंद आचेवर तळून घ्या, नाहीतर बाहेरून शिजलेले दिसतील आणि आतून कच्चे राहतील.

  • दोन्ही बाजूंनी चांगले शिजवल्यानंतर, कटलेट टिश्यू पेपरवर काढा जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.

  • आता तयार कटलेट्स हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करता येतील.

logo
marathi.freepressjournal.in