Testy Recipe in Marathi:आठवडाभर रेगुलर जेवण जेवल्यावर विकेंडला काही तरी हटके खायची इच्छा असते. वीकेंड हा असा वेळ असतो जेव्हा छान जेवणासोबत आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो. नाश्त्यापासूनच आपण काही खास बनवण्यासाठी अनेक रेसिपींचा विचार करू लागतो. तुमचा संपूर्ण मूड बदलण्यासाठी एक चांगली डिश उपयुक्त आहे. जर या विकेंडला काही सोप्या आणि मिनिटांच्या रेसिपीच्या शोधात असाल तर बेसन रवा टोस्टची रेसिपी ट्राय करा. आत्तापर्यंत तुम्ही रवा टोस्ट, एग टोस्ट आणि एवोकॅडो टोस्ट यासारख्या अनेक ब्रेड रेसिपी वापरून पाहिल्या असतील, बेसन रवा टोस्टची ही रेसिपी वेगळी आहे.
जाणून घ्या रेसिपी
> एक मोठा बाउल घ्या, त्यात एक वाटी बेसन, एक चतुर्थांश वाटी रवा, चवीनुसार मीठ, तिखट, धनेपूड आणि ओरेगॅनो घाला.
> पाणी घालून पीठ तयार करा. दुसरीकडे, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि गाजर बारीक चिरून घ्या. एका भांड्यात घेऊन त्याला मिसळून घ्या.
> गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवा आणि गरम करा, तव्यावर थोडे तेल लावून ग्रीस करा. ब्रेड स्लाईस पिठात बुडवून तव्यावर ठेवा.
> आता भाजीचे मिश्रण ब्रेडच्या स्लाइसवर पसरवा, त्यावर थोडे तेल शिंपडा, झाकण ठेवून दोन मिनिटे शिजवा.
> आता टोस्ट उलटा आणि भाज्या बाजूला देखील शिजवून घ्या. दोन्ही बाजूंनी नीट शिजवून घ्या
> तुमचा बेसन रवा टोस्ट टोस्ट तयार आहे.