Indian Non Veg Recipes: नॉनव्हेज खाणाऱ्यासाठी रविवारचा दिवस महत्त्वाचा असतो. या विकेंड असल्यामुळे तर आवर्जून काही तरी खास जेवायला बनवलं जातं. नॉनव्हेज लव्हरसाठी 'बटर चिकन' हा फार आवडीचा पदार्थ आहे. हा पदार्थ सहसा ढाब्यावर किंवा कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाल्ला जातो. परंतु या गर्मीच्या दिवसात जर तुम्हाला बाहेर जायचे नसेल तर तुम्ही घरीच बटर चिकन बनवू शकता. चला ही स्वादिष्ट डिश कशी तयार करायची ते जाणून घेऊयात.
लागणारे साहित्य
५०० ग्रॅम चिकन
५ टोमॅटो
५० ग्रॅम बटर
१ वाटी दही
५० ग्रॅम मोहरीचे तेल
५ हिरव्या मिरच्या
१० वेलची
१० लवंगा
१ दालचिनीची काडी
१ टीस्पून जावित्री
१ टीस्पून कसुरी मेथी
१ टीस्पून गरम मसाला
२ चमचे लाल तिखट
२ चमचे लिंबाचा रस
२ टीस्पून मीठ (चवीनुसार)
३ चमचे आले आणि लसूण पेस्ट
जाणून घ्या कृती
> चिकन नीट साफ करून त्याचे लहान तुकडे करावे. या तुकड्यांना तिखट, मीठ, लिंबाचा रस आणि आले व लसूण पेस्ट लावा. मॅरीनेट होण्यासाठी अंदाजे २० मिनिटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
> आता तुम्हाला फ्रिजमधून मॅरीनेट केलेले चिकन बाहेर काढा आणि अंदाजे ३० मिनिटे ओव्हनमध्ये शिजवा. चिकन चांगले भाजल्यावर ते बाहेर काढून एका भांड्यात ठेवा आणि आता ग्रेव्हीची तयारी करा.
> एका पॅनमध्ये तीन-चार चमचे तेल घालून बटर गरम करा. यामध्ये लवंग, दालचिनीची काडी, जावित्री आणि वेलची टाकून चॅन परतून घ्या. थोड्या वेळाने टोमॅटो, लसूण आणि आले घालून मिक्स करा.
> आता तुम्हाला दुसरे भांडे गॅसवर ठेवावे लागेल आणि त्यात बटर घालून गरम करावे लागेल. आता आले आणि लसूण पेस्ट घालून टोमॅटो प्युरी घाला. थोडा वेळ शिजू द्या.
> यानंतर,यामध्ये तिखट, कसुरी मेथी आणि इतर सर्व मसाले घालून भाजलेले चिकनचे तुकडे घाला. आता मंद आचेवर हे मिश्रण १०-१५ मिनिटे शिजवा.
> आता त्यात हिरवी मिरची, वेलची पूड आणि मलई घालून चांगले मिक्स करा. अशा प्रकारे तुमचे बटर चिकन तयार आहे. तुम्ही रोटी किंवा नान सोबत सर्व्ह करू शकता.