Gatari Recipe: 'चिकन लॉलीपॉप' सोबत साजरी करा गटारी; नोट करा झटपट तयार होणारी रेसिपी

Chicken Lollipop Recipe: चिकन लॉलीपॉप बनवण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते बनवण्यासाठी फारच कमी साहित्य आवश्यक आहे.
Gatari Recipe: 'चिकन लॉलीपॉप' सोबत साजरी करा गटारी; नोट करा झटपट तयार होणारी रेसिपी
Freepik
Published on

Gatari 2024: चिकन लॉलीपॉप ही अनेकांना आवडणारी रेसिपी आहे. चिकन लॉलीपॉप एक अतिशय कुरकुरीत अशी भारतीय चिकन डिश आहे. नॉनव्हेज खाणाऱ्यांनी हे अनेकवेळा खाल्ले असेल, पण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रेस्टॉरंटप्रमाणेच चिकन लॉलीपॉप घरीही बनवू शकता. चिकन लॉलीपॉप बनवण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते बनवण्यासाठी फारच कमी साहित्य आवश्यक आहे. तसेच, तुम्ही ते फक्त ३० मिनिटांत बनवू शकता. चला आजच्या गटारी निमित्त ही रेसिपी जणूं घ्या आणि रात्रीच्या जेवणासाठी बनवा.

साहित्य

चिकन - १० लेग पीस, कांद्याची पेस्ट - ३ टीस्पून, लसूण पेस्ट - १/२ टीस्पून, आले पेस्ट - १/२ टीस्पून, मिरची पावडर - १/२ टीस्पून, चिकन मसाला - १/२ टीस्पून, मीठ - चवीनुसार, मैदा - २ टीस्पून, कॉर्न फ्लोअर - २ टीस्पून, बेकिंग सोडा - १/२ टीस्पून

Gatari Recipe: 'चिकन लॉलीपॉप' सोबत साजरी करा गटारी; नोट करा झटपट तयार होणारी रेसिपी
Gatari Amavasya 2024 Wishes in Marathi: गटारी निमित्त मित्र-परिवारास द्या 'या' हटके शुभेच्छा!

जाणून घ्या कृती

सर्व प्रथम चिकनला मीठ आणि तिखट लावून बाजूला ठेवा.

आता एका भांड्यात आले-लसूण पेस्ट, मीठ, तिखट आणि चिकन मसाला एकत्र करा आणि या मिश्रणात लेग पीस मॅरीनेट करण्यासाठी ठेवा.

इथे दुसऱ्या भांड्यात कॉर्न फ्लोअर, बेकिंग सोडा आणि मैदा यांचे जाडसर पेस्ट तयार करा.

आता या पेस्टनमध्ये मॅरीनेट केलेले चिकन घालून चांगले मिसळा.

यानंतर कढईत तेल गरम करून लेगचे तुकडे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

logo
marathi.freepressjournal.in