Dahi Sandwich Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा 'दही सँडविच', नोट करा रेसिपी!

Breakfast Recipe: ही रेसिपी हेल्दी आणि झटपट तयार होणारी आहे. लहान मुलं ते मोठे सगळ्यांचं हा पदार्थ आवडेल.
easy breakfast recipe with bread
Freepik

Easy and Healthy Breakfast Recipe: सकाळचा नाश्ता किती महत्त्वाचा असतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. रात्रीच्या जेवणानंतर आपण ७-८ तासानंतर हे अन्न घेतो. म्हणूनच याला 'ब्रेक' 'फास्ट' असं म्हणतात. म्हणजेच सकाळी रात्रभर झालेला उपवास सोडणे. सकाळच्या वेळी नेहमीच काही तरी टेस्टी आणि हेल्दी खावं असं सांगितलं जातं. मग अशावेळी काय बनवायचं हा प्रश्न पडतो. याशिवाय मुलांना आवडेल असे पदार्थ बनवणे हा मोठा टास्क असतो. याचसाठी आम्ही एक टेस्टी सँडविचची रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी हेल्दी आणि झटपट तयार होणारी आहे. लहान मुलं ते मोठे सगळ्यांचं हा पदार्थ आवडेल. चला दही सँडविच कसं बनवायचं ते जाणून घेऊयात.

लागणारे साहित्य

१ वाटी दही, ब्रेड, बटर , मीठ, काळी मिरी पावडर, चाट मसाला, १ चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, चिरलेली कोथिंबीर

जाणून घ्या कृती

  • सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात दही काढा आणि छान फेटून घ्या.

  • फेटल्यानंतर त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची घाला.

  • सर्व काही मिक्स केल्यानंतर त्यात मीठ, काळी मिरी पावडर आणि थोडा चाट मसाला घाला. पुन्हा एकदा चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिसळा. शेवटी त्यात चिरलेली कोथिंबीर घाला.

  • आता ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर हे मिश्रण लावा. मिश्रण व्यवस्थित लावल्यानंतर त्यावर दुसरा ब्रेड वर ठेवा.

  • यानंतर, पॅन गरम करा, त्यावर बटर लावा आणि नंतर सँडविच छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजा.

  • नाश्त्यासाठी दही सँडविच तयार आहे.

logo
marathi.freepressjournal.in