Dalia Recipe: नाश्त्यात बनवा गव्हाची लापशी, दिवसभर मिळेल भरपूर ऊर्जा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Breakfast Recipe: हा हेल्दी, पोटभरीचा झटपट तयार होणार नाश्ता कसा बनवायचा हे जाणून घेऊयात.
Dalia Recipe: नाश्त्यात बनवा गव्हाची लापशी, दिवसभर मिळेल भरपूर ऊर्जा; जाणून घ्या सोपी रेसिपी
@Cooking Easy/ YouTube

Healthy Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काही तरी टेस्टी पण तेवढंच हेल्दी खायचं असतं. अशा टेस्टी आणि हेल्दी पदार्थांचा नेहमी शोध घेतला जातो. अशाच एक हेल्दी पदार्थ म्हणजे लापशी. गव्हाची लापशी ( Laapsi) हा एक उत्तम नाश्त्याचा पर्याय आहे. यामध्ये भरपूर फायबर आणि इतर पोषक तत्व असतात. हा पदार्थ वजन कमी करायलाही मदत करतो. लहान मुले ते अगदी गर्भवती महिलांसाठीही हा एक उत्तम नाश्ता पर्याय ठरू शकतो. सकाळी याचे सेवन केल्याने दिवसभर तुम्हाला ऊर्जा मिळेल. मुलांसाठी आणि हा पदार्थ जास्त हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही त्यात आवडत्या भाज्याही घालू शकता. चला हा हेल्दी, पोटभरीचा झटपट तयार होणार नाश्ता कसा बनवायचा हे जाणून घेऊयात.

लागणारे साहित्य

 • २०० ग्रॅम लापशीचे गहू

 • १०० ग्रॅम वाटाणे

 • १ टीस्पून मोहरी

 • २ हिरव्या मिरच्या चिरून

 • १ चिरलेला कांदा

 • १ टीस्पून किसलेले आले

 • १०० ग्रॅम किसलेले गाजर

 • १/४ कप रिफाइंड तेल

 • १ मूठभर चिरलेली कोथिंबीर

जाणून घ्या कृती

 • सर्व प्रथम गव्हाची लापशी स्वच्छ करून पाण्याने नीट धुवा. त्यातलं पाणी काढून टाका आणि बाजूला ठेवा.

 • यानंतर प्रेशर कुकरमध्ये ३-४ चमचे रिफाइंड तेल घालून मध्यम आचेवर ते एक मिनिट गरम करा.

 • गरम झालेल्या तेलात मोहरी टाका आणि ती तडतडायला लागल्यावर लगेच कांदा, हिरवी मिरची आणि आले घाला.

 • कांदा हलका गुलाबी होईपर्यंत साहित्य छान परतून घ्या.

 • काही वेळाने मटार, गाजर, लापशी आणि मीठ घाला. सर्व साहित्य नीट मिसळा.

 • हे मिश्रण मध्यम-मंद आचेवर ३-४ मिनिटे परतून घ्या.

 • या मिश्रणात ४-५ कप पाणी घालून १ शिट्टी वाजवून शिजवून घ्या.

 • लापशी नीट शिजल्यावर सर्व्हिंग बाऊलमध्ये काढा.

 • या हेल्दी नाश्त्याला चिरलेली कोथिंबीरीने सजवा आणि चहा किंवा कॉफीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in