Ginger Chicken Masala Recipe: पावसाळ्यात जेवणासाठी बनवा टेस्टी 'जिंजर चिकन मसाला',नोट करा रेसिपी

Non Veg Recipe: जेवणासाठी रेगुलर नॉन व्हेज डिशेस खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही 'जिंजर चिकन मसाला' हा उत्तम पर्याय आहे.
Lunch/ Dinner Non Veg Recipe
Lunch/ Dinner Non Veg Recipe Freepik
Published on

How to Make Ginger Chicken Masala: पावसाळ्यातील थंडगार वातावरणात काहीतरी टेस्टी, चटपटीत खावंसं वाटतं. नॉन व्हेज लव्हर्सला तर या सिजनमध्ये चिकन डिशेस खायला फार आवडतात. यामुळेच आम्ही आज तुम्हाला घरी चिकन बनवण्याची अनोखी रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही चिकन करी, चिकन टिक्का, चिकन बिर्याणी आणि चिकन कोरमा चाखला असेल, पण तुम्ही कधी जिंजर चिकन मसाला खाल्ला आहे का? नसेल तर जेवणासाठी तुम्ही हे बनवू शकता. चला याची सोपी रेसिपी जाणून घ्या.

लागणारे साहित्य

  • चिकन लेग्ज - ४

  • कांदा - १०० ग्रॅम बारीक चिरून

  • खोबरं - ४ चमचे किसलेले

  • आले - २ टीस्पून बारीक चिरून

  • कढीपत्ता - २

  • बडीशेप - १ टीस्पून

  • लाल मिरची पावडर - १ टीस्पून

  • जिरे- ३ चमचे

  • काळी मिरी - २ चमचे

  • तेल - १०० मिली

  • मीठ - १ टीस्पून

जाणून घ्या कृती

  • सर्वप्रथम काळी मिरी, जिरे, बडीशेप आणि किसलेले खोबरे मिक्सरच्या भांड्यात टाका. नंतर त्यात थोडे पाणी घालून चांगले बारीक करून गुळगुळीत पेस्ट बनवा.

  • यानंतर कढईत थोडे तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा आणि त्यात चिरलेला कांदा घालून हलका गुलाबी होईपर्यंत परता.

  • पुढे कढीपत्ता आणि आले घालून छान परतून घ्या.

  • हे मिश्रण मंद आचेवर सुमारे ३० ते ६० सेकंद किंवा सुगंध येईपर्यंत शिजवा.

  • यानंतर तिखट आणि मीठ घालून मिक्स करा.

  • नंतर त्यात चिकनचे तुकडे आणि मसाल्याची पेस्ट घाला.

  • यानंतर साधारण ७५० ते ८०० मिली पाणी घालून मिक्स करा.

  • नंतर चिकन शिजेपर्यंत आणि मसाल्यात मिसळेपर्यंत छान शिजवून घ्या.

  • तुमचा स्वादिष्ट जिंजर चिकन मसाला तयार आहे.

  • सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून हिरव्या कोथिंबिरीने सजवा आणि गरम भात किंवा चपातीबरोबर सर्व्ह करा.

logo
marathi.freepressjournal.in