Jackfruit Kofta Recipe: फणसापासून बनवा टेस्टी कोफ्ते, जाणून घ्या चटकदार रेसिपी!

Summer Fruit Recipe: फणसाचा सीजन सुरु आहे. जर तुम्हाला या फळाला हटके पद्धतीने खायचं असेल तर तुम्ही फणसाचे कोफ्ते ट्राय करू शकता.
Freepik
Freepik

Dinner, Lunch Recipe: उन्हाळ्यातील एक टेस्टी फळ म्हणून फणसाकडे बघितलं जातं. फणस असेच तर आपण खातोच पण त्यापासून बनवल्या जाणाऱ्या रेसिपी तुम्ही कधी ट्राय केल्या आहेत का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला हटके रेसिपी सांगणार आहोत. फणसाची भाजी बनवली जाते. ही भाजी बनवण्याचे अनेक प्रकारही आहेत. पण तुम्ही कधी फणसाचे कोफ्ते खाल्ले आहेत का? होय तुम्ही फणसाचे कोफ्तेही बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला चविष्ट फणसाचे कोफ्ते कसे बनवायचे ते सांगत आहोत. ही भाजी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल.फणसाच्या कोफ्त्याची चव एकदम नॉनव्हेजसारखी वाटते. तुम्ही मसालेदार आणि अतिशय मऊ जॅकफ्रूट कोफ्ते बनवून खाऊ शकता. चला जाणून घेऊयात फणसाचे कोफ्ते बनवण्याची सोपी रेसिपी.

जाणून घ्या फणस कोफ्त्याची रेसिपी

> सर्वप्रथम अर्धा किलो फणसाची साल नीट सोलून घ्या, बिया काढून घ्या आणि फणस उकडून घ्या.

> आता उकडलेल्या फणसात २ चमचे बेसन घाला. १ चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल मिरची, अर्धा चमचा गरम मसाला, १ चमचा मीठ घालून सर्वकाही मिक्स करा.

> मसाला तयार करण्यासाठी त्यात ६-७ पाकळ्या लसूण, १ तुकडा आले, १ मोठा कांदा, १ हिरवी मिरची घाला.

> १ तमालपत्राचे तुकडे, थोडे जायफळ, १ मोठी वेलची, २ लहान वेलची, चक्रफुल, थोडी बडीशेप, दालचिनी, ४-५ लवंगा, ८ काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरे घालून मसाला बारीक करा.

> आता हाताला थोडे तेल लावून कोफ्त्याचे थोडे पीठ घेऊन लहान लिंबासारखे गोल करा.

> त्याचप्रमाणे सर्व कोफ्ते तयार करून गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करा.

> तेल गरम झाल्यावर सर्व कोफ्ते मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळा.

> आता कढईत तेल गरम करून त्यात अर्धा चमचा जिरे आणि १ तमालपत्र घाला.

> त्यात २ चिमूटभर हिंग टाका आणि मग त्यात ग्राउंड मसाला टाकून तळून घ्या.

> जेव्हा मसाला हलके तेल सोडू लागतो तेव्हा त्यात १ चमचे लाल मिरची, १ चमचे धने पावडर घाला.

> सर्व साहित्य चांगले शिजवून घ्या आणि नंतर २ टोमॅटो पेस्ट घाला आणि तळा.

> टोमॅटोला तेल सुटेपर्यंत शिजवा आणि मग तुम्हाला हवी तितकी ग्रेव्ही बनवा.

> ग्रेव्ही छान शिजवून घ्या आणि नंतर त्यात मीठ घाला.

> ग्रेव्हीमध्ये कोफ्ते घाला आणि नंतर आणखी ५ मिनिटे शिजू द्या.

> आता कोफ्त्यामध्ये थोडी कसुरी मेथी आणि हिरवी कोथिंबीर घालून थोडीशी थंड झाल्यावर सर्व्ह करा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in