Noodles Masala Recipe: घरी नूडल्स मसाला बनवायचा? जाणून घ्या सोपी रेसिपी, जेवणाची चव वाढेल!

Cooking Tips: स्वयंपाक करताना भाजी ते अन्य पदार्थात हा मिसळल्यास त्या पदार्थाची चव आणखीन वाढते. चला हा मसाला बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊयात.
Noodles Masala Recipe
Freepik
Published on

How to make noodles masala at home: नूडल्स ही डिश कोणाला आवडत नाही. लहान ते मोठे सगळेच आवर्जून ही डिश खातात. नूडल्समध्ये जो मसाला घातला जातो त्याची अनोखी चव असते. या घरगुती मसाल्याची चव अतिशय चविष्ट आणि मसालेदार असते. हा मसाला कोणत्याही पदार्थात मिसळल्यास त्या पदार्थाची चव वाढते. तुम्ही हा मसाला घालून रोजचा स्वयंपाकाही करू शकता. पण बाजारातील मसाल्यांप्रमाणे घरी बनवलेला मसाला तयार होत नाही असं अनेकांना वाटतं. तुम्हालाही असंच वाटत असेल तर काळजी करू नका, आम्ही तुम्हाला बाहेरच्या चवीचा मसाला कसा तयार करू शकता ते जाणून घेऊयात.

लागणारे साहित्य

२ चमचे धणे दाणे

१ टीस्पून जिरे

१ टीस्पून गरम मसाला

१/४ टीस्पून हळद

१ टीस्पून तिखट

२ पाकळ्या लसूण

१/२इंच आले

२ कांदे

१ टीस्पून आमचूर पावडर

१/४ टीस्पून काळी मिरी पावडर

१ चमचे चूर्ण साखर

१/२ टीस्पून मीठ

१ टीस्पून कॉर्न फ्लोअर

जाणून घ्या कृती

> सगळ्यात आधी एका छोट्या कढईत धणे, जिरे, मिरची, लसूण, आले, कांदा टाका आणि छान परतून घ्या. यानंतर हे मिश्रण थंड झाल्यावर त्याची पावडर बनवा.

> या तयार केलेल्या पावडरमध्ये १ चमचा गरम मसाला, १ चमचा हळद, १ चमचा आमचूर पावडर, १ चमचा काळी मिरी पावडर, १ चमचा पिठीसाखर, १ चमचा मीठ आणि १ चमचा कॉर्न फ्लोअर घाला.

> सर्व मसाले चांगले मिसळा. तुमचा नूडल्सचा मसाला तयार आहे. या मसाल्याला तुम्हाला जनरल स्टोअर्समध्ये मिळणाऱ्या मसाल्यांचीच चव मिळेल.

logo
marathi.freepressjournal.in