Moong Dal Dahi Vada: गर्मीत बनवा थंडगार मूग डाळ दही वडा, चवीसोबतच पोटासाठीही आहे फायदेशीर!

Summer Recipe: कडक गरम वातावरणात शरीराला आतून थंडावा देणार काही तरी खावंसं वाटतं. अशावेळी तुम्ही थंडगार मूग डाळ दही वडा बनवू शकता.
Moong Dal Dahi Vada Recipe
Freepik
Published on

Healthy Summer Recipe: दही वडा हा अनेकांचा आवडीचा पदार्थ आहे. या कडक उन्हाळ्यात तर काही तरी थंड खावंसं वाटतं. यावेळी तुमचा आवडता मूग डाळ दही वडा (Moong Dal Dahi Vada Recipe) बनवून खाऊ शकता. थंड दही वडा विशेषत: उन्हाळ्यात अजूनच स्वादिष्ट लागतो. बहुतेक घरांमध्ये उडीद डाळीपासून दही वडा बनवला जातो. उडीद डाळीचा वडा थोडा जड आणि पचायला जड असतो. अशा परिस्थितीत तुम्ही उडीद डाळीऐवजी मूग डाळीचे दही बनवून खाऊ शकता. मूग डाळ पचायला सोप असतो. मूग डाळ दही वडा बनवणे देखील खूप सोपे आहे. जाणून घेऊयात मूग डाळ दही वडा कसा बनवायचा

जाणून घ्या रेसिपी

  • सर्वप्रथम १/३ कप धुतलेली मूग डाळ आणि २/३ कप धुतलेली उडीद डाळ घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फक्त मूग डाळ घेऊ शकता.

  • दोन्ही डाळी पाण्याने धुवा आणि नंतर सुमारे ५ तास पाण्यात भिजवून ठेवा.

  • डाळी पुन्हा धुवा, सर्व पाणी गाळून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

  • आता मिक्सरमध्ये बारीक केलेले मिश्रण चांगले फेटून घ्या. हे मिश्रण फेटताना लक्षात ठेवा की फक्त एकाच दिशेने मिश्रण फेटा.

  • हे मिश्रण चांगले फेटले गेले आहे कि नाही हे तपासण्यासाठी, थोडेसे पिठ पाण्यात टाका. जर पिठ तरंगायला लागले तर याचा अर्थ ते व्यवस्थित फेटले गेले आहे.

  • आता या डाळीच्या पिठात बेदाणे, हिरवी मिरची, आले घालून थोडा वेळ फेटून घ्या.

  • एका भांड्यात साधारण १ लिटर साधे पाणी, १ ग्लास गरम पाणी आणि थोडी हिंग टाका.

  • आता वडा तळण्यासाठी कढईत तेल गरम करून पिठात त्याचे गोळे करून तेलात टाका.

  • वडा दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होऊन फुगला की बाहेर काढा.

  • तसेच सर्व वडे तयार करून लगेच पाण्यात टाका.

  • वडा साधारण अर्धा तास पाण्यात ठेवा आणि मग दही तयार करा.

  • दही फेटून त्यात पिठीसाखर घाला.

  • सर्व्ह करताना वडा पाण्यातून काढून हलके दाबून पाणी काढून टाकावे.

  • वडा एका प्लेटमध्ये ठेवा आणि वर दही, गोड चटणी, हिरवी चटणी घाला.

  • आता त्यात भाजलेले जिरेपूड, काळी मिरी पावडर, काळे मीठ घालून थंडगार दही वडा सर्व्ह करा.

logo
marathi.freepressjournal.in