Street style Kanda Bhaji Recipe: सर्वत्र पाऊस सुरु झाला आहे. पाऊस आणि काही गोष्टींचा समीकरण वर्षानुवर्षे आहे. असंच एक समीकरण म्हणजे पाऊस आणि भजी. थंडगार पावसाळी वातावरणात गरमा गरम कांदा भजी झालीच पाहिजेत. महाराष्ट्र राज्यातून, अनेक स्ट्रीट फूड स्नॅक्सचा उगम झाला आहे आणि ते संपूर्ण भारतभर लोकप्रिय झाले आहेत. अशीच एक लोकप्रिय डिश म्हणजे कांदा भजी. कांदा भजी वेगवगेळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. पण जास्त प्रसिद्ध आहे म्हणजे मुंबई स्टाईल कांद्याची भजी. चला आज आम्ही तुम्हाला मुंबई स्टाईल कांद्याची भजी कशी बनवायची ते सांगतो. सोपी रेसिपी नोट करा.
लागणारे साहित्य
२ कांदे, उभे चिरून
१/४ टीस्पून हळद
१/२ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
१/४ टीस्पून ओवा
१ मिरची, बारीक चिरलेली
२ चमचे कोथिंबीर, बारीक चिरलेली
१/२ टीस्पून मीठ
१ कप बेसन
तळण्यासाठी तेल
जाणून घ्या कृती
प्रथम एका मोठ्या भांड्यात उभा चिरलेला कांदा घ्या.
कांद्यात १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून मिरची पावडर, १/४ टीस्पून ओवा, १ मिरची आणि २ चमचे कोथिंबीर आणि १/२ टीस्पून मीठ टाकून चांगले मिसळा.
सर्व पाणी काढून टाकण्यासाठी कांदे पूर्णपणे पिळून घ्या.
पुढे दीड कप बेसन घालून मिक्स करा.
आवश्यकतेनुसार अधिक बेसन घालून जाडसर पीठ तयार करा.
हाताला तेलाने ग्रीस करा आणि भजीच्या मिश्रणाचा थोडासा भाग घेऊन भजी गरम तेलात सोडा आणि मध्यम आचेवर तळून घ्या.
कांदा भजी गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
अतिरिक्त ओलावा काढून टाकण्यासाठी किचन पेपरवर भजी काढून घ्या.
तुमच्या आवडत्या चटणीसोबत भजी खायला द्या.