Poha Nuggets Recipe: सकाळी वेळ नाहीये? नाश्तसाठी बनवा झटपट तयार होणारे पोहे नगेट्स

Breakfast Recipe in Marathi: सकाळच्या बिझी शेड्युलमध्ये पटकन तयार होणारा नाश्त्या बनवायचा असेल तर पोहे नगेट्सची रेसिपी ट्राय करून बघा.
How to make Poha Nuggets
Freepik

How to Make Poha Nuggets: भारतीय घरांमध्ये पोहे हा पदार्थ हमखास नाश्त्यासाठी बनवला जातो. पण रेगुलर त्याच प्रकारचे पोहे खाऊन कंटाळा येतो. मग अशावेळी नाश्त्यासाठी नवीन पदार्थांचा शोध घेतला जातो. जर तुम्हीही असाच शोध घेत असाल तर तुम्ही पोहे नगेट्स बनवू शकता. चविष्ट पोहा नगेट्स हा एक डिश आहे जी लहान असो वा मोठे सर्वांनाच आवडेल. पोहा नगेट्स कमी वेळेत बनवता येतात. याचमुळे सकाळच्या बिझी शेड्युलमध्ये हा नाश्त्यासाठी एक उत्तम पदार्थ ठरू शकतो. जर तुम्हाला पोहे नगेट्स बनवायचे असतील तर तुम्ही आम्ही दिलेल्या रेसिपीला फॉलो करून ते सहज तयार करू शकता. चला रेसिपी जाणून घेऊयात.

लागणारे साहित्य

 • पोहे - १ कप

 • उकडलेले बटाटे - ४-५

 • चीज क्यूब्स - १५

 • चिरलेली हिरवी मिरची - १ टीस्पून

 • कोथिंबीर चिरलेली – २ चमचे

 • लाल मिर्च पावडर - १/४ टीस्पून

 • गरम मसाला - १/२ टीस्पून

 • काळी मिरी पावडर - १/४ टीस्पून

 • आले-लसूण पेस्ट - १ टीस्पून

 • तेल - तळण्यासाठी

 • मीठ - चवीनुसार

जाणून घ्या कृती

 • सर्व प्रथम पोहे स्वच्छ करून नंतर दोन-तीन वेळा पाण्याने धुवावेत, एका भांड्यात २-३ चमचे पाणी टाकून भिजण्यासाठी ठेवावे.

 • आता बटाटे कुकरमध्ये उकडून घ्या आणि नंतर उकडल्यानंतर त्यांची साले काढून एका भांड्यात मॅश करा.

 • एका भांड्यात आले-लसूण पेस्ट, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, तिखट, काळी मिरी पावडर आणि इतर सर्व मसाले घाला.

 • आता बटाट्यात हे सर्व मसाले चांगले मिसळा आणि नंतर चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

 • आता तयार मिश्रण थोडे थोडे हातात घेऊन त्याचे नगेट्स बनवा आणि मधोमध चीजचा तुकडा ठेवून त्याला चौकोनी आकार द्या. त्याचप्रमाणे सर्व नगेट्स तयार करून प्लेटमध्ये ठेवा.

 • आता कढईत तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर तयार पोहे नगेट्स घालून तळून घ्या.

 • नगेट्स दोन्ही बाजूंनी कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत परतवून घ्या. यानंतर एका प्लेटमध्ये पोहे नगेट्स काढा. त्याचप्रमाणे सर्व पोहे नगेट्स तळून घ्या.

 • चविष्ट पोहे नगेट्स नाश्त्यासाठी तयार आहेत, त्यांना चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा.

logo
marathi.freepressjournal.in