Rajasthani Style Gatta Curry Recipe: जेवणासाठी बनवा राजस्थानी गट्ट्याची भाजी, नोट करा सोपी रेसिपी!

Gatte Recipe: जेवणासाठी काही तरी हटके खायचं असेल तर तुम्ही राजस्थानची प्रसिद्ध गट्ट्याची भाजी कशी बनवायची ते जाणून घ्या.
how to make Rajasthani Style Gatta Curry know Recipe
Freepik

Dinner, Lunch Recipe: भारत हा खाण्याच्या बाततीतही विविधतेने नटलेला आहे. वेगवगेळ्या राज्याच्या वेगवगेळ्या डिशेस बनवल्या जातात. बेसनापासून राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात रेसिपी बनवल्या जातात. अशीच एक रेसिपी फार प्रसिद्ध आहे ती म्हणजे राजस्थानची गट्ट्याची भाजी. राजस्थानमध्ये गट्ट्याची भाजी बहुतेक घरात खाल्ली जाते. या राजस्थानच्या रेसिपीची चव तुम्ही महाराष्ट्रातही घेऊ शकता. होय, तुम्ही राजस्थानी गट्ट्याची भाजी घरी बनवू शकता. घरी भाजी नसेल तर ही गट्ट्याची भाजी एक उत्तम पर्याय आहे. अतिशय मऊ राजस्थानी स्टाईलमधील गट्ट्याची भाजी कशी बनवायची ते जाणून घेऊयात...

जाणून घ्या रेसिपी

> गट्टे तयार करण्यासाठी एका भांड्यात ३/४ कप बेसन घ्या.

> या बेसनाच्या पिठात १ चमचा लाल तिखट, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून धनेपूड, १/४ टीस्पून मीठ, १/२ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून आणि थोडी ओवा घालून हाताने चुरून घ्या. हे सर्व मसाले छान मिक्स बनवून घ्या.

> आता या मिश्रणात २ चमचे तूप किंवा कोणतेही तेल घाला. लक्षात घ्या तुम्ही जेवढे तूप गट्ट्यात घालाल तेवढे ते गट्टे मऊ होतात, त्यामुळे तुपाचे प्रमाण योग्य ठेवा.

> आता बेसन चांगलं कुस्करून घ्या आणि थोडं थोडं कोमट पाणी घालून कणिकेसारखे मळून घ्या. लक्षात ठेवा बेसन जास्त मळू नये कारण गोळे कडक होतील.

> मळलेले पीठ थोडावेळ सेट होऊ द्या आणि नंतर त्याला गोलाकार लांब गुळगुळीत रोल तयार करा. लक्षात ठेवा की रोल जास्त जाड किंवा खूप पातळ नसावा.

> आता एका पातेल्यात २ वाट्या पाणी उकळून त्यात बेसनचे रोल टाका. झाकण ठेवून ८-१० मिनिटे मंद आचेवर शिजवा आणि उकळल्यावर त्यात पांढरे दाणे दिसू लागतील.

> गॅस बंद करा आणि गट्टा पाण्यात सोडा. छोडे थंड झाल्यावर पाण्यात असतानाच सुरीने कापून घ्या.

> आता भाजी बनवण्यासाठी १ कप ताजे दही घ्या, त्यात हळद, मिरची, धणे आणि मीठ घाला.

> कढईत तेल किंवा तूप टाकून त्यात लसूण, जिरे, हिंग, २ बारीक चिरलेले कांदे, हिरवी मिरची घालून परतून घ्या.

> मसाले भाजून झाल्यावर त्यात बनवलेली दही आणि मसाल्याची पेस्ट घाला. लक्षात घ्या की दही मिसळताच ढवळत राहा, नाहीतर दही घासण्याचा धोका असतो.

> मसाला तेल सुटल्यावर पाण्याबरोबर गट्टा घाला.

> तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रेव्ही घट्ट ठेवू शकता. वरून हिरवी कोथिंबीर घालून गरम गरम चपातीसोबत ही भाजी सर्व्ह करा.

logo
marathi.freepressjournal.in