Healthy and Easy Recipe: नाश्ता हा फार महत्त्वाचा असतो. नाश्त्यामुळे दिवसभर काम करायला ऊर्जा मिळते. नाश्त्यात नेहमी हेल्दी आणि चविष्ट पदार्थ खावेत. यामुळेच आम्ही एक छान नाश्त्याचा पर्याय घेऊन आलो आहोत. आम्ही तुमच्यासाठी मसालेदार सिंधी कोकीची रेसिपी घेऊन आलो आहोत. तिखट आणि चटपटीत कोक्की खायला जितकी चविष्ट आहे तितकीच बनवायलाही सोपी आहे. या पदार्थाची खास गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना ५-६ दिवस सहज स्टोअर करून ठेवू शकता. प्रवासादरम्यानही तुम्ही याचा वापर करू शकता. सिंधी कोकी सहजासहजी खराब होत नाही. चला जाणून घेऊयात सिंधी कोकी कशी बनवायची ते...
जाणून घ्या सोपी कृती
सिंधी कोकी गव्हाच्या पिठापासून तयार केली जाते, त्यामुळे साधारण १-२ कप गव्हाचे पीठ घ्या.
पिठात थोडे मीठ,ओवा, जिरे आणि कसुरी मेथी घाला.
आता त्यात थोडी ठेचलेली बारीक चिरलेली लाल आणि हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा हळद घाला.
आता त्यात २ टेबलस्पून तूप आणि १ मध्यम आकाराचा कांदा घाला. त्यात तुम्ही इतर कोणतीही भाजी टाकू शकता.
आता थोडे घट्ट पीठ मळून घ्या. थोडंसं घट्ट पीठ असावे जास्त गुळगुळीत पीठ मळू नये.
मळून झाल्यानंतर पीठ सेट करण्यासाठी सोडा. आता पिठाचा गोळा घ्या आणि हाताने थोडा दाबा.
तव्यावर तूप लावून गरम करून त्यात बनवलेले पिठाचा गोळा थोडावेळ भाजून घ्या आणि मग बेलण्याने छान गोल लाटून घ्या.
कडा फारच फाटल्या असतील तर हाताने थोडेसे सेट करा आणि हलक्या हाताने थोडे जाडसर रोल करा.
आता दोन्ही बाजूंना तूप लावून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत शिजवा.
जाळीच्या स्टँडवर ठेवा जेणेकरून ते थंड झाल्यावर पूर्णपणे कुरकुरीत होईल.
मसालेदार सिंधी कोकी तयार आहे, नाश्त्यात किंवा संध्याकाळी चहासोबत खा.