How to make Sprouts Paratha: सकाळचा नाश्ता हेल्दी असावा. तुम्ही रेगुलर रेसिपी ट्राय करून कंटाळा असाल तर वेगवगेळ्या नवीन रेसिपीचा शोध घेतला जातो. मोड आलेले कडधान्य किंवा स्प्राउट्स हा एक ऊत्तम पर्याय आहे. स्प्राउट्सच्याही त्याच त्याच रेसिपी खाऊन तुम्ही कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही स्प्राउट्सपासून क्रिस्पी टेस्टी पराठा बनवू शकता. हा पराठा एक हेल्दी पर्याय आहे. चला स्प्राउट्सचा पराठा कसा बनवायचा हे जाणून घेऊयात.
लागणारे साहित्य
मूग १ कप, २-३ उकडलेले बटाटे, मैदा - २ वाट्या, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, कोथिंबीर - २ टेबलस्पून, ओवा - अर्धा टीस्पून, जिरे - अर्धा टीस्पून, तेल - मीठ - आवश्यकतेनुसार चवीनुसार
जाणून घ्या कृती
> सर्वप्रथम मूग रात्रभर भिजत ठेवा. सकाळी, गॅस चालू करा आणि मूग शिजवून घ्या जेणेकरून ते मऊ होतील.
> २ ते ३ बटाटे उकडून घ्या.
> बटाटे सोलून घ्या आणि त्यात शिजवलेले मूग घालून छान मॅश करा.
> आता या मिश्रणात अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून सर्वकाही चांगले मिसळा. पराठ्यात भरण्यासाठी मसाला तयार आहे.
> आता एका भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यात ओवा, जिरे सोबत थोडे तेल आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करा. आता त्यात पाणी टाकून पीठ मऊ मळून घ्या.
> तयार पिठाला ५-१० मिनिटे तसेच ठेवा नंतर त्याचे गोळे करून थोडे लाटून घ्या. यानंतर चपातीच्या मधोमध थोडासा तयार मसाला टाका, तो बंद करा आणि नंतर हलक्या हाताने छान गोलाकार लाटून घ्या.
> आता गॅस चालू करा आणि नॉनस्टिक पॅनमध्ये तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात लाटलेला पराठा टाकून भाजून घ्या. पराठा दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तेल न लावताही हा पराठा बनवू शकता.
> तुमचे पराठे तयार आहेत. त्यांना सॉसबरोबर सर्व्ह करा आणि आनंद घ्या.