Tandoori Chicken Puffs: नॉन व्हेजमध्ये टेस्टी स्टार्टर शोधत आहात? बनवा तंदूरी चिकन पफ

Non-Veg Starter: काहीतरी वेगळं, नवीन आणि स्वादिष्ट पदार्थ ट्राय करायचं असेल तर एकदा तंदूरी चिकन पफ्स नक्की बनवा.
How to make Tandoori Chicken Puffs
How to make Tandoori Chicken PuffsFreepik
Published on

Tandoori Chicken Puffs Recipe: जेव्हा जेव्हा नॉन जेव्ह जेवणाचा उल्लेख केला जातो तेव्हा चिकन सर्वात आधी डोळ्यसमोर येते. चिकनचा वापर स्टार्टर्स, सूप ते मेन कोर्स असा सगळ्यातच केला जातो. चिकन बिर्याणी, चिकन करी, चिकन मोमोज असे पदार्थ नेहमी खाल्ले जातात. स्टार्टर्समध्ये अनेकदा चिकनचे लॉलीपॉप बनवले जातात. पण तुम्ही तंदूरी चिकन पफ्स कधी खाल्ले आहेत का? चिकनपासून बनवलेला हा अतिशय चवदार आणि हटके स्टार्टर्सचा पदार्थ आहे. काहीतरी वेगळं, नवीन आणि स्वादिष्ट पदार्थ ट्राय करायचं असेल तर एकदा तंदूरी चिकन पफ्स नक्की बनवा. चला या पदार्थाची सोपी रेसिपी जाणून घ्या.

लागणारे साहित्य

  • ३०० ग्रॅम बोनलेस चिकन

  • २ चमचे दही

  • १ टीस्पून आले-लसूण पेस्ट

  • १ टीस्पून तंदुरी मसाला

  • १ टेबलस्पून लिंबाचा रस

How to make Tandoori Chicken Puffs
Tomato Soup Recipe: पावसाळ्यात नाश्त्यासाठी बनवा टेस्टी टोमॅटो सूप, जाणून घ्या पद्धत
  • १/२ टीस्पून हळद

  • १/२ टीस्पून लाल मिरची पावडर

  • १ टीस्पून तेल

  • १ अंड

  • १-२ पफ पेस्ट्री शीट्स

  • चवीनुसार मीठ

जाणून घ्या कृती

  • सर्वात आधी स्टफिंग तयार करण्यासाठी एका भांड्यात दही, तंदुरी मसाला, आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट आणि लिंबाचा रस घाला.

  • आता त्यात बोनलेस चिकनचे तुकडे टाका आणि चांगले मिसळा आणि किमान अर्धा तास मॅरीनेट होऊ द्या.

  • मॅरीनेट झाल्यावर चिकन तेलाने फवारलेल्या पॅनमध्ये शिजवून घ्या आणि बाजूला ठेवा.

  • आता, पफ पेस्ट्री शीट्स घ्या आणि त्यांना लहान आयतांकृतीमध्ये शेपमध्ये कापून घ्या.

How to make Tandoori Chicken Puffs
Rice-Dal Vada Recipe: रविवारच्या नाश्त्यासाठी बनवा टेस्टी डाळ-तांदळाचे वडे; रिमझिम पावसात मिळेल आनंद
  • यानंतर, तयार तंदुरी चिकन स्टफिंग प्रत्येकाच्या मध्यभागी ठेवा आणि सर्व कडा चांगल्या प्रकारे दुमडून घ्या. सर्व बाजूंनी योग्यरित्या सील केले आहे हे नीट चेक करा.

  • आता सर्व पफच्या वर फेटलेले अंड लावा

  • प्री-गरम केलेल्या ओव्हनमध्ये १८० अंशांवर सुमारे २० मिनिटे किंवा पूर्णपणे शिजेपर्यंत बेक करा.

  • तुमच्या आवडत्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

logo
marathi.freepressjournal.in