भारतात, सहसा जेवणासोबत बाजूला काहीना काही तरी वाढलं जातं. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, लोणचं, पापड, कोशिंबीर यांचा समावेश आहे. अनेकांना काहींना चटणी इतकी आवडते की त्यांना चटणीशिवाय जेवण अपूर्ण वाटते. हिरव्या कोथिंबीरीची किंवा शेंगदाण्याची चटणी हे आपल्या भारतीय घरात नेहमीच बनवली जाते. पण जर तुम्हाला कोथिंबीरीची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही टोमॅटो आणि लसूण चटणी ट्राय करून पाहू शकता. चला जाणून घेऊयात टोमॅटो-लसूण चटणीची रेसिपी.
कशी बनवायची चटणी?
सर्वात आधी टोमॅटो धुवून मधूनमधून कापून घ्या. यानंतर कांदाची सालं काढून मधून कापून घ्या. लसूण सोलून घ्या.
आता तव्यावर तेल गरम करून टोमॅटो छान परतून घ्या.
यानंतर तव्यावर चिरलेला कांदा आणि सोललेला लसूण चांगले परतून घ्या.
या सर्व गोष्टी परतवून झाल्यावर ते थंड झाल्यावर टोमॅटोची साल काढून वेगळी करा.
हे सर्व साहित्य थंड झाल्यावर ब्लेंडरमध्ये टोमॅटो, कांदा आणि लसूण सोबत मीठ, मिरची पावडर, धनेपूड आणि जिरेपूड घाला.
जर तुम्हाला ते जास्त मसालेदार आवडत असेल तर तुम्ही सुरुवातीला हिरवी मिरची भाजून घ्या आणि नंतर ब्लेंडरमध्ये सर्व मसाल्यांसोबत बारीक करा.
या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे बारीक करा.
अशाप्रकारे टोमॅटो-लसूण चटणी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
या टोमॅटो-लसूण चटणीची चव मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सर्वांनाच आवडेल. ही चटणी बनवण्यासाठी ना जास्त साहित्य लागेल ना जास्त वेळ लागेल.